शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतरही वनकामगारांची फरफट

By admin | Updated: August 3, 2015 00:17 IST

उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत

कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा : कायम करण्याची मागणीअमरावती : उच्च न्यायालयाने वनकामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतरही वनविभाग वनकामगारांना सेवेत कायम करण्यापासून वंचित ठेवत आहेत. न्यायालयाच्या पायऱ्या झिजवूनदेखील न्याय मिळत नसेल किमान कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त वनकामगारांनी केली आहे.राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रानुसार सन २००० नंतर न्यायालयातून आलेल्या वनकामगारांना सेवेत कायम करण्यासाठी वनविभाग दिरंगाई करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील एक ते दीड हजार वनकामगार कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. १९९९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार वनकामगार २००४ मध्ये सेवा पूर्ण करतात म्हणून कायम केले. परंतु २००० नंतर कार्यरत वनकामगारांची सेवा शासनाला पाठविण्यात आली नाही. किंबहुना न्यायालयाने सलग सेवा असे आदेश दिल्यानंतरही सदर वनकामगारांची सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे २० वर्षे लढा देणाऱ्या वनकामगारांना वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष अवधूत जांभुळकर यांनी केला आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तक नसल्याने या कामगारांना न्याय मिळू शकला नाही, हे वास्तव आहे. काही जिल्ह्यांमध्ये वनकामगारांचे हजेरी पुस्तकांना उदई लागून नामशेष झाले आहे. कोठे गोदामात ते पाण्याने सडून गेल्याचे चित्र आहे. नियमाप्रमाणे शासकीय दस्तावेज हे ३० वर्षे सांभाळून ठेवणे अनिवार्य आहे. वनकामगारांच्या कॅशबुकमध्ये प्रचंड घोळ करून ठेवण्यात आला आहे. नावात तफावत, बदल अशा प्रकारमुळे कोणत्या वनकामगारांना न्याय मिळेल, ही बाब चिंतणीय आहे. वनविभागाने कर्मचाऱ्यांचे मस्टर व्यवस्थितरीत्या सांभाळून ठेवले नसल्याने याचा फटका वनकामगारांना बसत आहे. न्यायालयाने सलग सेवा, असे आदेश देऊनही वनकामगांराना न्याय मिळत नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त वनकामगारांना किमान त्यांच्या कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, असे अवधूत जांभुळकर यांनी पत्राद्वारे शासनाला कळविले आहे. (प्रतिनिधी)वनकामगारांवर अन्याय होत असेल तर तो कसा सहन करायचा? यावर दाद मागण्यासाठी मुख्यमंत्री, वनमंत्री, उच्चन्यायालयात पत्र पाठविण्यात आले आहे. दोन महिन्यांत सदर प्रश्न निकाली निघाला नाही तर आत्मदहन केले जाणार आहे.- अवधूत जांभुळकर, अध्यक्ष, वनकामगार संघटना.