शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सरळसेवेच्या वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांनी लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 17:43 IST

वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही.

 - गणेश वासनिक 

अमरावती - वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ही संख्या शेकडोच्या घरात असताना शासनाचा बुडीत महसूल वसूल करण्यासाठी वरिष्ठ वनाधिका-यांनी पुढाकार घेतला नाही, हे विशेष.सन १९७६ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वनसंरक्षक वर्ग २ ची पदे आता वर्ग १ ची झाली आहेत. सन १९९० पासून वर्ग २ च्या पदांसाठी उमेदवारांची निवड भरती नियमानुसार केली जाते. सदर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी राज्य सरकारचे त्या उमेदवारास पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र देण्याचे करारानुसार बंधनकारक आहे. या पत्रातील शर्र्थींचा भंग केल्यास अथवा मध्येच सेवा सोडून गेल्यास प्रशिक्षणावर झालेला पूर्ण खर्च व उर्वरित पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत उमेदवारांवर खर्च केलेली रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे. मात्र, गत ३५ वर्षांत सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी वनविभागाची सेवा सोडून आयएएस, आयएफएस, आयपीएस, डीवायएसपी, जिल्हा निबंधक, तहसीलदार अशा विविध पदांवर त्यांची वर्णी लागली आहे. वनविभागाची सेवा सोडून गेलेल्या अशा उमेदवारांकडून बंधपत्रातील करारानुसार प्रधान मुख्यवनसंरक्षक, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी एकही रूपया वसूल केला नाही. त्यामुळे वनविभागात वरिष्ठांकडूनच नियमांचे पालन होत नसेल तर कनिष्ठ वनकर्मचाºयांकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी केला भंगवनविभागात सरळेसेवेत सहायक वनसंरक्षकपदी रूजू झालेत. मात्र, कालावधी पूर्ण न करता मध्येच दुसरीकडे नोकरी स्वीकारल्यास बंधपत्रातील तरतुदींनुसार भंग केल्याची नोंद आहे. यात सरळसेवेतील सहायक वनसंरक्षक शेषराव पाटील, चंद्रकांत खाडे, एस.के. सिसोदीया, अशोक रामटेके, एस.बी. गायकवाड तर वनक्षेत्रपाल म्हणून डी. गुजेला, रामचंद्र पोळे, संभाजी गवई, वडतकर, सैंगदाने, कुळकर्णी, भालेकर आदींचा समावेश आहे.

प्रधान वनसचिवांकडून आदेशाची प्रतीक्षासरळसेवेचे आरएफओ, एसीएफ यांनी करारानुसार भंग केल्याप्रकरणी १९८४ पासून त्यांच्यावर राज्य शासनाने खर्च केलेली रक्कम बंधपत्रातील तरतुदीनुसार कोणीही वसूल केलेली नाही. हा सरळसरळ शासन तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. तथापि, ज्यांनी करारानुसार बंधपत्राचे अटींचे पालन केले नाही, अशा अधिकाºयांकडून व्याजाच्या रक्कमेसह पैसे वसूल करण्यासाठी प्रधान वनसचिवांनी आदेश पारित करावे, अशी प्रतीक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती