उन्हाळ्याची चाहूल : तपासणी सुरू, घातपाताची शक्यताअमोल कोहळे पोहरा बंदीउन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राण्यांची पाणवठ्यावर शिकारीच्या घटना घडू नये, यासाठी वन विभागाद्वारे जानेवारी महिन्यापासून जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २२५ वर नैसर्गिक पाणवठे असून उन्हाळ्यात पाणवठे दुर्मिक्ष जाणेवल असल्याने नैसर्गिक पाणवठे वन्यप्राण्यांना दिलासा देणारी ठरते. पोहरा, चिरोडी, वडाळी, माळेगाव, बडनेरा, शेकदरी, लिगा, महेंद्री, वाई या राखीव वनक्षेत्रात वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्त्व वाढले आहे. त्यामुळे अमरावती वनविभागात सुद्धा पाणवठे तपासणे करणे, त्याची स्वच्छता करणे, याकरिता वनकर्मचारी कामाला लागले. नैसर्गिक पाणवठ्यांवर विषबाधा करण्यासाठी अवैध शिकारी करणारे पुढे सरसावतात. त्यासाठी वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यांची संख्या पोहरा, चिरोडी, वरुडा, कारला, माळेगाव, गोदपूर, भानखेडा, घातला, छत्रीतलाव, धोतरखेडा, महेंद्री जंगल असल्याने मेळघाटच्या तुलनेत या जंगलात वन्यप्राण्यांना पाण्या स्त्रोत अधिक आहे. मात्र मेळघाटात अशा प्रकारचे तलाव कमी असल्याने वनविभागापुढे कृत्रिम पाणवठे तयार करण्यावर अधिक भर असतो. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एच. पडगव्हाणकर यांनी संबंधित वनपाल वनरक्षकांना व वनमजुरांना उन्हाळ्याच्या दृष्टीने पाणवठ्यावर नजर ठेवून पाणवठ्यावर रात्रेंदिवस गस्त ठेवली असून पाणवठे स्वच्छ करणे, त्याची तपासणी करणे याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उन्हाळ्याचे ४ महिने नैसर्गिक पाणवठे वन्यप्राण्यांना दिलासा देणारे ठरत असल्याने चित्र आहे. नैसर्गिक पाणवठे तपासणी होत आहे. चिरोडी, वरुड, कारला, माळेगाव, सावगा या वनक्षेत्रात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांची नियमित रात्रेंदिवसा तपासणी व स्वच्छता केली जात आहे. तशा सूचना वनपाल वन वनरक्षकांना वनमजुरांना दिल्या आहे. (प्रतिनिधी)
नैसर्गिक पाणवठ्यांवर वन विभागाची नजर
By admin | Updated: February 12, 2016 00:58 IST