शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार; अधिकारी, कर्मचारी कसे करणार वनसंरक्षण

By गणेश वासनिक | Updated: December 17, 2022 17:41 IST

आठ वर्षांपासून वन खात्याला एकही नवे वाहन मिळाले नाही

अमरावती : राज्यात पोलिस खात्यानंतर सर्वाधिक फौजफाटा असलेल्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने भंगारवस्थेत आहे. गत आठ वर्षापासून वन विभागाला एकही नवे वाहन मिळाले नाही. त्यामुळे वन संवर्धन आणि वन्यजीवांचे संरक्षण कसे करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

युती शासनाच्या काळात सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना म्हणजे आठ वर्षांपूर्वी ४५० वाहने ही पेट्रोलिंग कार म्हणून दिले होते. त्यानंतर आजपर्यंत वन विभागात नव्याने एकही वाहन राज्य सरकारने दिले नाही, अशी माहिती आहे.

गत पाच वर्षांपासून वन विभागात वाहनांची मागणी शासनाकडे करीत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता शिंदे, फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुन्हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यामुळे वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार झाल्याच्या अनुषंगाने ना. मुनगंटीवार हे वाहनांचा बॅकलॉग भरून काढतील, अशी अपेक्षा आहे.

हल्ली वन विभागात ४०० पेक्षा जास्त वाहने नादुरूस्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे जंगलाचे रक्षण आणि वन्यजीवांचे संरक्षणाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तर वन विकास महामंडळाला स्वतंत्र दर्जा असल्याने तेथे आवश्यकतेनुसार वाहनांची खरेदी केली जाते, हे विशेष. जुन्या वाहनांमुळे दुरूस्ती, ईंधनाचा खर्च वाढतोय

वन विभागात १० ते १२ वर्षापासून वाहने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. वाहने जुनी झाल्याने दुरूस्ती खर्च बेसुमार हाेत आहे. दर १५ ते २० दिवसांनी फिल्डवरील वनाधिकाऱ्यांची वाहने गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी पाठविली जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जंगल क्षेत्रात फिल्डवर असताना वनाधिकारी हे वाहन नादुरूस्त होणार नाही, याचीच चिंता त्यांना अधिक सतावते. त्यामुळे चालकाला जंगल क्षेत्र वा वन्यजीव क्षेत्रात वाहने जरा सांभाळूनच चालवावी लागत असल्याची माहिती आहे. 

वनाधिकाऱ्यांकडे अशी आहेत वाहने- वन बल प्रमुख : १- प्रधान मुख्य वनसंरक्षक : ५- अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक : २२- मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक) : ११-मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) : ६- उपवनसंरक्षक : ९०- सहायक वनसंरक्षक : ३५०- वनपरिक्षेत्राधिकारी : ९००वन विभागात वाहनांबाबत आढावा घेण्यात येईल. आठ वर्षापूर्वी मी वनमंत्री असताना ४५० वाहने वन विभागाला दिली होती. आता वाहनांची गरज आणि आवश्यकता लक्षात घेता नव्याने वाहन खरेदीबाबत निर्णय घेण्यात येईल.

- सुधीर मुनगंटीवार, वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री

टॅग्स :forest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारGovernmentसरकार