शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

वनक्षेत्रपालांचा ‘ड्रेसकोड’ला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:58 PM

सामाजिक वनीकरण विभागातील बारा वनक्षेत्रपालांना गणवेशाबाबत ताकीद देण्यात आली आहे. गणवेश परिधान न करता हे वनक्षेत्रपाल विभागीय कार्यालयातील बैठकीला आले होते. यावर त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. वनसंरक्षकांच्या दौऱ्याच्या अनुषंगानेही संबंधितांना ड्रेसकोडची आठवण करून देण्यात आली आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीपेक्षा गणवेशाचीच चर्चा या विभागात अधिक आहे.

ठळक मुद्देवनसंरक्षकांचा दौरा : ३३ कोटी वृक्षलागवडीपेक्षा गणवेशाचीच चर्चा अधिक

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सामाजिक वनीकरण विभागातील बारा वनक्षेत्रपालांना गणवेशाबाबत ताकीद देण्यात आली आहे. गणवेश परिधान न करता हे वनक्षेत्रपाल विभागीय कार्यालयातील बैठकीला आले होते. यावर त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. वनसंरक्षकांच्या दौऱ्याच्या अनुषंगानेही संबंधितांना ड्रेसकोडची आठवण करून देण्यात आली आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीपेक्षा गणवेशाचीच चर्चा या विभागात अधिक आहे.गणवेशाविना १ डिसेंबरच्या बैठकीला उपस्थित वनक्षेत्रपालांमध्ये अंजनगाव सुर्जीचे अ.ना. गावंडे, तिवसाचे प्र.पु. ढोले, मोर्शीचे श्री.श्री. सुपे, अमरावतीचे द.मु. भार्गवे, चांदूरबाजारचे अ.के. जोशी, नांदगाव खंडेश्वरचे ज्ञा.भा. पवार, वरूडचे सं.मे. मेश्राम, दर्यापूरचे मो.रा. आवारे, चिखलदºयाचे व.नि. हरणे, चांदूर रेल्वेचे पु.प्र. धांदे, धामणगाव रेल्वेचे यो.बा. मगर, अचलपूरचे अ.का. माकडे यांचा समावेश आहे. या वनक्षेत्रपालांच्या सोबतीला धारणी येथील वनरक्षक प.अ. चव्हाण गणवेशाविनाच बैठकीला हजर झाले होते. या १२ वनक्षेत्रपालांमध्ये चार महिला वनक्षेत्रपाल आहेत.सर्वांना विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग (अमरावती) यांनी गणवेशाबाबत लेखी ताकीद दिली आहे व खुलासा मागविला आहे. सभा, दौरे, वरिष्ठ कार्यालयांमध्ये गणवेशाविना दिसून आल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.शासननिर्णयानुसार, गणवेश लागू आहे. त्यानुसार गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. गणवेश परिधान न करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईच्या सूचना आहेत. त्यापूर्वी आपणास खुलासा करण्याची संधी देण्यात येत असल्याचे त्या ताकीद पत्रात विभागीय वनअधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.रकमेची उचल; गणवेश नाहीप्रत्यक्षात गणवेशाकरिता प्रत्येक वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षकांना ५ हजार १६१ रूपये देण्यात आले आहेत. साधारणपणे मार्च १८ मध्ये सर्वांनीच या रकमेची उचल केली आहे. दरवर्षी गणवेशाकरिता शासनाकडून पैसे दिले जात असल्यामुळे नवा गणवेश शिवणे क्रमप्राप्त ठरते. पण, दोन-चार वगळता अनेकांनी गणवेश शिवलेलाच नाहीत.गणवेश नसल्यास कारवाईसामाजिक वनीकरण विभागात नव्याने रूजू झालेल्या वनसंरक्षकांनी ६ जानेवारीपासून जिल्हा दौरा निश्चित केला आहे. ३३ कोटी वृक्षलागवड अंतर्गत मंजूर रोपवाटिकांची कामे वनसंरक्षक आपल्या दौऱ्यात बघणार आहेत. यात काही अनियमितता आढळल्यास वनक्षेत्रपालांना जबाबदार धरण्यात येईल, असे सूचवितानाच, गणवेश नसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वनसंरक्षकांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने ड्रेसकोडवर भर देण्यात आला असून, वनक्षेत्रपालांना गणवेश परिधान करण्याबाबत नव्याने आठवण करून देण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागासह प्रादेशिक वनविभाग, वन्यजीव विभागातही वनक्षेत्रपालांना ड्रेसकोड लागू आहे. पण, बहुतांश वनक्षेत्रपाल गणवेश वापरत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.