शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

‘कॅटरीना’चा छावा अमरावतीच्या जंगलात ?

By admin | Updated: January 5, 2017 00:13 IST

पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार करणारा वाघ हा बोर अभयारण्यातील कॅटरिना वाघीणीचा छावा असू शकतो,

बोर अभयारण्य सूत्रांची माहिती : स्थलांतरणानंतर पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार अमरावती : पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार करणारा वाघ हा बोर अभयारण्यातील कॅटरिना वाघीणीचा छावा असू शकतो, असा अंदाज बोर व्याघ्र प्रकल्पातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. कॅटरीना वाघिणचे चार छावे दोन ते तीन महिन्यांपासून दृष्टीस पडत नसल्यामुळे हा अंदाज वर्तविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोहरा-चिरोडीच्या जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याचे सन २०११ मध्ये स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी ट्रॅप कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे वाघाचे छायाचित्र काढण्यात आले नव्हते. त्यानंतर सन २०१५ मध्ये पुन्हा वाघ दिसून आला. त्याचे छायाचित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाले होते. त्यावेळी तो वाघ बोर अभयारण्यातून आल्याचे वन्यप्रेमी संघटना व वनविभागाने स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने आता दिसून आलेला वाघ हा बोर अभयारण्यातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोहरा-चिरोडीत आढळलेल्या वाघाचे छायाचित्र अमरावती वनविभागाने वनविभागाच्या अन्य कार्यालयांकडे पाठविले आहे. वाघांच्या तेथील छायाचित्रांवरून अमरावतीच्या जंगलात आढळलेल्या वाघाची ओळख पटविली जाणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरमध्ये ‘कॅटरिना’ नावाची वाघीण वास्तव्यास आहे. तिला चार छावे आहेत. आता तिचे हे छावे दोन ते अडीच वर्षांचे झाले आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून हे चारही छावे ‘कॅटरीना’ जवळ दिसून आले नाहीत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिशेच्या जंगलात गेले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातील एक छावा हा बोर जंगलापासून जवळ असणाऱ्या पोहरा-चिरोडीत आला असावा, असा अंदाज वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मात्र, अमरावती वनविभागाने याची पृष्ठी केलेली नाही. स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी बोरमधील या वाघिणीचे नाव ‘कॅटरिना’ ठेवले आहे. कॅटरिनाच्या कॅटवॉकशी यावाघिणीच्या डौलदार चालीचे साधर्म्य वाटल्याने हे नाव ठेवले असल्याची माहिती आहे. वाघ आल्याच्या पार्श्वभूमिवर ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘कॉरिडोअर’ बदलविताना मार्गावर सोडतात खुणा प्रत्येक वाघाचे स्वतंत्र कॉरिडोअर असते. ते कॉरिडोअर बदलविताना त्यांच्या मार्गावर वाघ काही खुणा किंवा निशाण सोडून पुढे जातात. त्यांची विष्ठा, मलमूत्र तसेच झाडांवर नखाने ओरबाडल्याच्या खुणा जंगलात आढळून येतात. काही वर्षांपूर्वी पोहरा-चिरोडीत आलेल्या बोर अभयारण्यातील वाघानेही काही निशाण किंवा खुणा सोडल्या असाव्यात. त्या दिशेनेच कॅटरिना वाघीणीचा छावा पोहरा-चिरोडीत आला असावा, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांचा आहे.