शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बनावट स्वाक्षरीप्रकरणी अखेर फौजदारी

By admin | Updated: February 3, 2017 00:12 IST

प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी

मुहूर्त सापडला : स्वच्छता देयकांमधील अनियमितताअमरावती : प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी महापालिकेकडून बुधवार १ फेब्रुवारीला अखेर फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर संबंधिताविरूद्ध पोलिसांकडून फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार असल्याचेही शेटे म्हणाले. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी फौजदारी कारवाईचे निर्देश शेटे यांनी सोमवार २३ जानेवारीला दिले होते. त्यानंतर तब्बल १० दिवसांनी स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचा मुहूर्त सापडला.बडनेरा शहरातील दोन प्रभागातील साफसफाईच्या देयकावर स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. ‘ती’बनावट स्वाक्षरी कुणाची, हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. ‘बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे बिल’ या शीर्षकाने साफसफाई देयकामधील ही अनियमितता ‘लोकमत’ने रविवार २२ जानेवारीच्या अंकात उघड केली. त्याअनुषंगाने सोमवार २३ ला आयुक्त हेमंत पवार यांनी अतिरिक्त आयुक्तांकडून याबाबत माहिती घेतली तथा चौकशीच्या अनुषंगाने काही सूचना केल्यात. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी त्या देयकावरील बनावट स्वाक्षरी कुणाची, हे शोधण्यासाठी थेट फौजदारी तक्रार नोंदविण्याचा पवित्रा घेतला. या पवित्र्यामुळे संबंधित घटकांचे धाबे दणाणले होते. मात्र, मध्यंतरी हे प्रकरण मुळापासून दडपण्याचे प्रयत्न करण्यात आले. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही वाढल्या होत्या. उगाच फौजदारी कारवाई केली तर ‘चेन’ब्रेक होईल, असा युक्तीवाद करण्यात आला. आयुक्तांकडे विशिष्ट व्यक्तींकडून रदबदलीसुद्धा करण्यात आली. मात्र, त्यानंतर ‘लोकमत’ने ‘एफआयआरला बे्रक’असे वृत्त प्रकाशित केल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामुळे १० दिवसांनंतर का होईना, बनावट स्वाक्षरी प्रकरणात अरूण तिजारे यांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध शहर कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली.(शहर प्रतिनिधी)महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत. कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ्य निरीक्षकांकडून देयकांबाबत अहवाल सादर केला जातो. विविध स्तरावर त्या देयकांची तपासणी केल्यानंतर देयके अदा केली जातात. यातील चार देयकांमध्ये बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. (प्रतिनिधी)असे होते प्रकरण बडनेऱ्यातील प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथिल बहिरमबाबा संस्था आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवारबाजार येथील मरिमाता बचतगट या संस्थेचे माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांची चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती.चौकशी व्हायलाच हवी स्वास्थ अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरीने साफसफाईची देयके अतिरिक्त आयुक्तांकडे येणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. साफसफाई देयकांवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, काही नागरी वस्तींचा अपवाद वगळता स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. त्यामुळे यापूर्वी असे काही प्रकार घडलेत का, यादिशेने विभागीय चौकशी होणे गरजेचे आहे.