शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपंखाचे सात वर्षांनंतर अमरावतीत आगमन, परदेशी पक्षाची मांदियाळी         

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:29 IST

राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले.

 - गणेश वासनिक 

अमरावती - राजस्थान, गुजरात व कच्छ परिसरातून हिवाळ्यात ठाणे, नवी मुंबई व लगतच्या खाडीकिनारी दाखल होणा-या रोहित पक्ष्यांचे आगमन तब्बल सात वर्षांनंतर अमरावती जिल्ह्यात झाले. लगतच्या सावंगा विठोबा तलावावर पक्षिमित्र शुभम गिरी, प्रशांत निकम व तुषार अंबाडकर यांना अग्निपंखाचे दर्शन झाले. यापूर्वी सन २००४ आणि सन २०११ मध्ये वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांना या पक्ष्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर सात वर्षांनी तो शनिवारी दिसून आला.रोहित किंवा अग्निपंख अशा नावाने ओळखले जाणारे हे पक्षी हिवाळ्यात विदर्भात दाखल होतात. त्यांना फ्लोमिंगो या इंग्रजी नावानेही ओळखले जाते. यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी तलाव व यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर येथे अग्निपंखाचे दर्शन झाले होते. राजस्थान, गुजरात व कच्छ ही यांची प्रजनन स्थळे आहेत. ते दलदलीत आपली घरटी बांधून त्यात अंडी घालतात. मात्र, तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागली की, ते नोव्हेंबर महिन्यात पाणी  महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडीकिनाºयांवर येतात. रोहित पक्ष्यांच्या जगात एकूण सहा प्रजाती आहेत. त्यातील ग्रेटर फ्लेमिंगो नावाच्या प्रजातीचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे त्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे खास वैशिष्ट्य आहे. या पक्षाची चोच अत्यंत वैशिष्टपूर्ण असून, बाकदार आकारामुळे या पक्ष्याला चिखलातील खाद्य शोधण्यास सोपे जाते.याव्यतिरिक्त इतरही पक्षी जिल्ह्याच्या विविध तलावांवर दाखल झाले आहेत. मात्र, त्यांची संख्या कमी आहे. एकू ण पक्ष्याच्या स्थलांतरण नोंदींमध्ये प्रजातीनिहाय वाढ झाली असली तरी वैयक्तिक प्रजातींच्या संख्येत मात्र प्रचंंड घट झाली आहे. सध्या तलावावर लिटिल स्टिन्ट, ब्लॅक -टेल, गॉडवीट, ब्लॅक हेडेड गल, नॉर्थर्न शोवेलर, नॉर्थर्न पिनटेल, युरेशियन करलू, वूड सॅन्डपायपर आदी पक्षी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

रोहित पक्ष्यांचे आगमन महत्त्वपूर्ण असून, ते निसर्ग संतुलनाचे प्रतीक आहे. अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान असणाºया रोहित पक्ष्यांना अभय देणे गरजेचे आहे. तलावातील पाण्याची कमी होणारी पातळी चिंतेचा विषय आहे. तसेच तलाव प्लास्टिक मुक्त असणे आवश्यक आहे. अन्यथा पक्ष्यांचे संवर्धन व संरक्षण करणे कठीण होईल.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक, दिशा फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यAmravatiअमरावती