शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील १९ लाख नागरिकांना अन्न सुरक्षेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:24 IST

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्यात सात कोटी, तर पश्चिम विदर्भात १९.३९ लाख नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न सुरक्षा मिळत आहे. 

अमरावती - केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्यात सात कोटी, तर पश्चिम विदर्भात १९.३९ लाख नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न सुरक्षा मिळत आहे. 

राज्यात ग्रामीण भागात ५५ टक्के तर शहरी भागातील ४५ टक्के जनतेला या योजनेंतर्गत हक्काचे धान्य मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अमरावती विभागातील एपीएल (केशरी) कार्डधारक व शेतकरी लाभार्थी अशा एकूण १९ लक्ष ३९ हजार ५५५ लाभार्थी आहेत. त्यांना ६ हजार ७५० मेट्रिक टन गहू आणि २ हजार ९४८ मे.टन तांदूळ असे एकूण ९ हजार ६९८ मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले.या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांना जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लाभार्थींना धान्य मिळाले नसल्यास तक्रारीची सुनावणी घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार त्यांना आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करणे, तसेच जिल्हा तक्रार निवारण अधिकाºयांच्याविरुद्ध अपिलांची सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेणे इत्यादी कामे या आयोगामार्फत करण्यात येतात.

वर्गवारीनुसार वाटप रेशन धान्य* अमरावती ६ लाख ३ हजार ३३२ लाभार्थ्यांना ३ हजार १७ मे.टन, अकोला २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थ्यांना १ हजार २६५ मे.टन, वाशिम २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थ्यांना १ हजार २३५ मे.टन, बुलडाणा ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थ्यांना २ हजार १५५ मे. टन, यवतमाळ ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थ्यांना २ हजार २६ मे.टन गहू-तांदूळ धान्याचे वितरण करण्यात आले आहे. * अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय योजनेमध्ये अमरावती विभागातील ४ लाख ४ हजार ५२० कार्डधारकांना ९ हजार ६५१ मे.टन गहू व ४ हजार ५५३ मे. टन तांदूळ असे एकूण १४ हजार २०४ मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य गट योजनेमध्ये अमरावती विभागातील ६ लाख ७२ हजार ८६९ लाभार्थ्यांना ३० हजार ५९० मे.टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. 

राज्य शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आहे. याची प्रभावी अंमलबजावनी अमरावती विभागात सुरू आहे. रेशनकार्डच्या वर्गवारीनुसार विभागात नियमित वितरण सुरू आहे.- रमेश मावस्कर,उपायुक्त (पुरवठा)

टॅग्स :foodअन्नAmravatiअमरावती