इंदल चव्हाण - अमरावतीसफरचंदवर लावण्यात येणारा मेणाचा लेप हा खाद्य की अखाद्य हे सिद्ध करण्यासाठी या मेणाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवू. तो अखाद्य असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर न्यायालयात खटला चालविला जाईल, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त मिलिंद देशपांडे यांनी दिली. सफरचंद हा दैनंदिन जीवनात आवश्यक फलाहार संबोधले जाते. त्यामुळे तो बाराही महिने विक्रीकरिता उपलब्ध असतो. मात्र ते अधिक काळ टिकून राहू शकत नाही. त्यामुळे सफरचंदच्या वरील भागावर मेणाचा लेप लावला जातो; तथापि त्याला शासनाची मान्यदेखील आहे. मात्र लावण्यात येणारा मेणाचा लेप हा खाद्य स्वरुपाचा असावा. मेण हे दोन प्रकारचे आहेत, खाद्य आणि अखाद्य. खाद्य असलेले मेण हे सहदापासून बनविले जाते. त्याचा लेप लावणे म्हणजे अधिक खर्चाची बाजू असल्यामुळे व्यापारी अखाद्य स्वरुपाचेदेखील मेण वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे 'लोकमत'ने १९ आॅगस्ट रोजी 'सफरचंद खा, पण जपून' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. बहुतांश नागरिकांनी घरी आणून ठेवलेल्या सफरचंदावर चाकुने घासून पाहिले असता मेणाचा थर करून त्यावर आगपेटीची काडी उगाळून पाहिल्याचे सांगण्यात आले. दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने फळविक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या सफरचंदचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू केल्याचेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.अखाद्य मेणात वापरले जाणारे घटक हे मानवी शरीराला कसे घातक ठरतात याला येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायी पोट विकार तज्ज्ञ मुरली बूब यांनी पुष्टी दिली.
अन्न, औषधी विभाग ठेवणार फळविक्रेत्यांवर 'वॉच'
By admin | Updated: August 20, 2014 23:15 IST