शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील लोकगीतांचे होणार संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:19 IST

केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे.

ठळक मुद्देमाहिती सूचना व प्रसारण मंत्रालयाचा पुढाकारसंस्कृतीचा अविस्मरणीय ठेवा दृक्श्राव्य स्वरूपात संकलित करणार

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे संस्कार, सण, उत्सव आणि त्यावर आधारित लोकगीतांच्या संवर्धनास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात लोकगीतांच्या संवर्धनाची जबाबदारी आकाशवाणी केंद्रांकडे सोपविण्यात आली आहे.प्रसार भारतीच्या विविध आकाशवाणी परिक्षेत्रात येणाऱ्या जाती-जमातींचे लोकगीत ध्वनिमुद्रित करणे, या गीतांची मूळ संहिता त्याच भाषेत लिहिणे, मूळ गीतांचे इंग्रजीत व हिंदीत भाषांतर करणे, त्या गीतांचे नोटेशन तयार करणे तसेच आॅडिओ तथा व्हिडिओ ध्वनिमुद्रण केले जात आहे. केंद्रीय माहिती सूचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आणला जात आहे. दुर्मिळ लोकगीतांच्या संवर्धनाचे काम २०१६ पासून सुरू आहे. आदिवासी भाषांना लिपी नसल्याने संशोधनासाठी आकाशवाणी केंद्रांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. देशात विविध प्रांतांमध्ये प्रत्येक २०० ते ३०० किमी अंतरावर भाषा, संस्कृतीत बदल होतो. हीच बाब लोकगीतांच्या माध्यमातून संवर्धन केली जात आहे.मेळघाटच्या कोरकू, गवळींच्या २०० लोकगीतांचे संकलनअमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या कोरकू, गवळी जमातीची संपूर्ण जीवन व्यवस्था लोकगीतांनी व्यापली आहे. त्यांच्या लौकीक आणि पारलौकीक जीवनाची अभिव्यक्ती लोकगीतातूनच झाली आहे. या दोन्ही समाजांची गीते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहेत.अमरावती आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम प्रमुख तथा प्रकल्पप्रमुख सुनालिनी शर्मा, प्रकल्प निर्मिती सहायक संजय ठाकरे, मार्गदर्शक काशीनाथ बºहाटे, सुनील मावस्कर, रामगोपाल भिलावेकर आदींच्या परिश्रमातून २०० लोकगीतांचे संकलन करण्यात आले आहे. ही लोकगीते आॅडिओ, व्हिडिओ, मूळ संहिता, हिंदी भाषांतर, संगीतबद्ध करून केंद्र सरकारकडे पाठविली आहेत.दिल्ली वगळता अन्य राज्यांतील १५० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प पोहोचला आहे. आतापर्यंत २० हजार लोकगीतांची मूळ संहिता प्राप्त झाली आहे. प्रकल्पांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर, छायाचित्र उपलब्ध झालेत. गुजरातपासून तर मणीपूर आणि काश्मीरपासून ते पोर्ट ब्लेअरपर्यंत १५० भाषांतील लोकगीते संकलित झाली आहेत.- सोमदत्त शर्मा, लोकगीत प्रकल्प प्रमुख, दिल्ली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक