शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्रमाच्या पालवीला फुलविली यशाची फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:45 IST

सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली.

ठळक मुद्देसंघर्षातून उन्नतीकडे : शेतकरी महिलेची जगण्याची जिद्द

मोहन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कधामनगाव रेल्वे : सततची नापिकी व कर्ज असल्याने आष्टा येथील शेतकरी राजेंद्र पिसे याने आत्महत्या केली. यामुळे पत्नी व एक मुलगी, दोन मुलाचे आयुष्य उघड्यावर आले. परंतु, संघर्षातून वाट काढत जिद्दीने संघर्षातून शेती जयवंताबाईने शेती करून तालुक्यातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला.आष्टा येथील जयवंता पिसे शेतात राबून संसाराचा गाडा ओढत आहेत. पती नसला तरी दोन मुले अन् एक मुलगी तिला शेतीच्या कामात मदत करतात. २००७ साली पती राजेंद्र पिसे यांनी ५० हजार रुपयांच्या कर्जापाई आत्महत्या केली. या घटनेने हदरलेल्या तिच्या समोर आपल्या दोन मुलाचे काय हा प्रश्न कायम होता. नियतिशी दोन हात करण्याचा निर्णय घेवून तीने आपला जीवन लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवून, घरातील दोन एकर  शेती करण्याचा निश्चय केला. कुणाच्याही मदतची वाट न पाहता मुलगा सुमित ललित व मुलगी प्रगती  यांनी शिक्षणासह आईला शेतीच्या कामात मदत सुरु केली. पैशाची चणचण भासली की जयवंता दुसºयाच्या शेतात मजुरी करायची. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीदेखील ती काळजी घेत होतीच. पतिवियोगाचे दु:ख तर जयवंताला आहेच, मात्र आता रडत बसायचे सोडून कामासाठी पदर खोचला आहे.यंदा जयवंताने आपल्या दोन  एकर शेतात सोयाबीन पेरले असून या वर्षीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी अपेक्षा आहे आणि यात तिला मदत करतात तिचे दोन मुले मुले. शेतीच्या कामात ते सतत तिच्या सोबत असतात.  त्यासाठी मुलगीदेखील आपल्या अभ्यासासोबत  तिच्या आईला शेतात मदत करते.आज  जयवंताबाई उत्तम प्रकारे शेती करीत असून त्या स्वत: सक्षमपणे शेती व्यवसाय साभांळत आहेत. पतीच्या आत्महत्येनंतर त्या खचून न जाता आज स्वत:च शेतात खंबीरपणे निर्णय घेऊन राबत आहेत.