शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

सहा तालुक्यातील नदीनाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:28 IST

जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले.

ठळक मुद्दे२७ गावांचा संपर्क तुटलासिपनावरील उतवली गावाजवळ पूल वाहून गेलाभिंती कोसळल्याने चार जखमीसहा तालुक्यातील तीन पुलांचे नुकसानपेढी नदीलाही पूर, पिके बाधितफैलढाणा, हरिसाल, दुनीमध्ये घरे वाहून गेलीतहसील प्रशासनाद्वारे पंचनामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची झड आहे. शनिवारी सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा सार्वत्रिक दमदार पाऊस झाला. यामध्ये चिखलदरा व धारणी तालुक्यात दशकातला रेकार्ड तुटला. तब्बल १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने नदी-नाले ओव्हर-फ्लो झाले. धारणी तालुक्यात सिपना नदीला पूर आल्याने दिया व उतावली दरम्यानचा पूल वाहून गेला. यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले, तर तीन घटनांमध्ये घरांच्या भिंती कोसळल्याने चार व्यक्ती जखमी झाल्या. शहानूर नदीपात्रात एक युवक बुडाला. तीन ठिकाणी पूल खचल्याने व दोन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.चिखलदरा तालुक्यात १४८.९ व धारणी तालुक्यात ८५.२ मिमी अशी पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. या तालुक्यांसह अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील नदी-नाल्यांनाही पूर आलेला आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक ४२.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात २१.८ मिमी, भातकुली १९ मिमी, नांदगाव खंडेश्वर ११ मिमी, चांदूर रेल्वे ४.९ मिमी, धामणगाव ८.४ मिमी, तिवसा ८.४ मिमी, मोर्शी ४०.६ मिमी, वरुड ५३.५ मिमी, अचलपूर ६०.९ मिमी, चांदूरबाजार ६२.१ मिमी, दर्यापूर ३१.८ मिमी व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४२ मिमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांपासून जिल्ह्यात झड असल्याने पावसाची सरासरी सुधारली असली तरी अद्यापही सात तालुक्यांत पाऊस ७५ टक्क््यांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३०९.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ७६.४ आहे. यामध्ये ९५.६ टक्के पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झालेला आहे. अमरावती तालुक्यात ८३ टक्के, भातकुली ४८.४, नांदगाव खंडेश्वर ५३.३, चांदूर रेल्वे ७२.६, धामणगाव रेल्वे ७६, तिवसा ६३, मोर्शी ६५.१, वरूड ५६.९, अचलपूर ९५.२, दर्यापूर ७०.७, अंजनगाव सुर्जी ८६.४, धारणी ९३.९, तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ९५.३ टक्के पाऊस कोसळला आहे.१२ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीजिल्ह्यात १२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये चिखलदरा २१७, टेंब्रुसोडा ११७, सेमाडोह २०७.४, धारणी १०९, धूळघाट ९८, हरिसाल ९०, चांदूर बाजार ७१, तळेगाव मोहणा ९५, ब्राम्हणवाडा थडी ७४, अचलपूर ९०, परतवाडा ८० व राजुराबाजार ६५ मिमी पाऊस कोसळला.याव्यतिरिक्त चुरणी ५४.२, सावलीखेडा ४५, सातेगाव ४३, भंडारज ५०, विहिगाव ५१, अंजनगाव सुर्जी ५२, कोकर्डा ४१, दर्यापूर ३५, वडनेरगंगाई ५४, येवदा ३८, बेलोरा ४८, करजगाव ५७, आसेगाव ४२, शिरजगाव कसबा ४८, परसापूर ३८, रासेगाव ६३, पथ्रोट ६२, वरूड ५२, बेनोडा ४४, लोणी ५५ शेंदूरजनाघाट ४१, पुसदा ६०, अंबाडा ६२, हिवरखेड ४८ व रिद्धपूर मंडळात ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तीन घरे कोसळली; चार जखमीजिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन तालुक्यांमध्ये घराची भिंत कोसळून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात कसबेगव्हाण येथे घराची भिंत कोसळल्याने बानोजी सलाबतखाँ मुदताजबी सलाबतखाँ या जखमी झाल्या, तर सोनू भासकर यांचा पाय फॅक्चर झाला आहे. चांदूरबाजार तालुक्यात वसंता धुर्वे यांच्या घरांची भिंत कोसळून भाग्यश्री उईके ही चिमुकली गंभीर जखमी झाली तसेच वैष्णवी अनिल उईके व विमल ओझालाल धुर्वे जखमी झाले आहेत. धारणी तालुक्यात १० घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अचलपूर तालुक्यात सावळी, गौरखेडा व इतर गावांमध्ये काही घरांचे नुकसान झाले असल्याची प्र्राथमिक माहिती आहे. तलाठ्यांद्वारे बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू अहे.असा झाला सहा तालुक्यात कहरअतिवृष्टीमुळे अचलपूर तालुक्यात भुलेश्वरी नदीला महापूरपरतवाडा- अंजनगाव राज्य मार्ग बंद. पथ्रोट, शिंदीमध्ये पाणी शिरले.धारणी, चिखलदऱ्यात अतिवृष्टी.आदिवासींचे जीवनमान विस्कळीत.सपन प्रकल्पाची दारे उघडली. पूर्णा, शहानूर, चंद्रभागातील जलसाठा वाढलाधारणी तालुक्यातील तापी, गडगा, सिपना नद्यांना पूरचिखलदरा तालुक्यात सलोना ते लोणाझरी रस्त्यावर दरड कोसळली.अचलपूर तालुक्यातील चमक येथील तीन बंधारे गेले वाहूनखरपी ते परतवाडा मार्गातील पूल खचला. वाहतूक खोळंबली.पर्यायी मार्ग पाण्याखाली आल्याने अमरावती-मोर्शी वाहतूक बंद.दिया-बैरागड व धारणमहू-ढाकरमल मार्गावरील पूल खचला.भातकुली तालुक्यातील पेढी नदीला पूर. नदीकाठची पिके बाधित.