शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पूर नियंत्रण कक्ष थेट मंत्रालयातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपशी ‘कनेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 22:25 IST

अमरावती : पूर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या घटना त्वरित अद्ययावत कराव्या लागणार आहे. माहितीचे ...

अमरावती : पूर नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबतच्या घटना त्वरित अद्ययावत कराव्या लागणार आहे. माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी-कर्मचा-यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप तयार करण्यात आला असून, त्यावर थेट मंत्रालयातील अधिकारी ‘कनेक्ट’ राहणार आहेत. त्यामुळे ग्रुपमधील अधिका-यांना २४ तास अलर्ट राहावे लागणार आहे. त्यासंदर्भाचे परिपत्रक शासनाने यापूर्वीच काढले असून,  ते राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आले आहे.  राज्यातील जलसंपदा विभागांतर्गत खोरेनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले असून, ग्रुपची निर्मिती ‘पूर नियंत्रण कक्ष’ मंत्रालय यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यात सचिव, कार्यकारी संचालक, संबंधित मुख्य अभियंता व पूर नियंत्रण कक्षातील इन्चार्ज आॅफिसरसुद्धा राहणार आहेत. -------------पूरनियंत्रणाबाबत वेळोवेळी 'अपडेट' धरणातून विसर्ग, पडलेला पाऊस, पूर्ण जलसंचय पातळी व सध्याची पाणीपातळी यासंदर्भाची माहिती दर चार तासांनी सदर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपडेट करावी लागणार आहे. या युनिटसाठी एक नवीन मोबाइल घेण्याच्या सूचना होत्या. तो २४ तास पूरनियंत्रण कक्षात असेल, जेणेकरून कायमस्वरूपी संपर्कात राहणे शक्य होईल. ------------वायरलेस यंत्रणा सज्जपूरनियंत्रण कक्षातील पाळी (ड्युटी) बदलत असताना मोबाइलवर माहिती 'अपडेट' करूनच ड्युटी संपवावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. नवीन येणाºया अभियंत्यास मोबाइल हस्तांतरित करण्यात यावा. पूरनियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणा सतत सज्ज ठेवावी लागणार आहे. सदरच्या मोबाइल ग्रुपवर अतिपर्जन्य, ढगफुटी तसेच धरण फुटण्याबाबत घटना त्वरित 'अपडेट' कराव्या लागणार आहेत. ग्रुप मेंबर्सना त्यांच्याकडील माहिती व मत त्यावर नोंदवावी लागणार आहे. --------- ३१ आॅक्टोबरपर्यंत कक्ष कार्यरतपावसाळ्यात महसूल व वनविभागाच्या अधिनस्थ मंत्रालयीन नियंत्रण कक्षात पूर नियंत्रणाच्या संनियंत्रणासाठी जलसंपदा विभागामार्फत १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीसाठी अधिकारी, कर्मचा-यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. पूरनियंत्रण कक्षात काम करताना कुठले नियम पाळावेत, यासाठी सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.