शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळावरुन एप्रिलपासून विमानांचे होईल 'टेक ऑफ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:11 IST

Amravati : भारतीय विमानतळ प्राधिकरण चमूकडून चाचणी, अमरावती-मुंबई विमानसेवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या चमूकडून बेलोरा विमानतळावर मंगळवारी 'हवाई कॅलिब्रेशन' ही चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे एप्रिलपासून विमानांचे 'टेक ऑफ' होणार असून, अमरावती-मुंबई ७२ एटीआर विमानसेवेचा अमरावतीकरांना लाभ मिळेल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

विमानतळाची 'पापी' हवाई कॅलिब्रेशनद्वारे चमूने चाचणी केली. यात बेलोरा विमानतळाचे प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटरचे हवाई कॅलिब्रेशन पूर्ण केले आहे. विमानचालन सुरक्षिततेत आवश्यक साधन असलेली पापी प्रणाली, धावपट्टीवर येणाऱ्या विमानांना अप्रोच दरम्यान योग्य ग्लाइड स्लोप राखण्यासाठी आणि सुरक्षित लैंडिंगसाठी सुनिश्चित करते, हे विशेष. 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक हजर

  • बेलोरा विमानतळाचे 'पापी हवाई कॅलिब्रेशन' महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्या मुंबईहून आल्या होत्या.
  • भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानतळाने कॅलिब्रेशन केले. जे ७सदस्यांच्या क्रूसह बंगळुरूहून विमानतळावर कॅप्टन अनूप काचरू आणि विमानचालन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
  • विमानाने २६/०८ धावपट्टीच्या बाजूने अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि यशस्वीरीत्या कॅलिब्रेशन पूर्ण केले.
  • पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर सिव्हिल वर्क आधीच पूर्ण झाले आहे. अलायन्स एअर प्रादेशिक कनेक्टिविटी योजनेंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर एटीआर ७२ सह नियोजित ऑपरेशन्स होईल.
  • बेलोरा विमानतळावर लावण्यात आलेली सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय विमानचालन संस्थांद्वारे निर्धारित कठोर मानकांना पूर्ण करतात.

७२ सीटर अमरावती - मुंबई विमानसेवा एप्रिलपासून सुरू होईल. पापी 'कॅलिब्रेशन' विमानतळाच्या पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा घटक

"बेलोरा विमानतळाचे मंगळवारी 'हवाई कॅलिब्रेशन'झाले. आता केंद्रीय उड्डयन मंत्रालयातून प्रवासी वाहतूक परवाना लवकर मिळेल. साधारणतः एप्रिलमध्ये विमानांचे 'टेक ऑफ' होईल."- गौरव उपश्याम, प्रभारी प्रबंधक, बेलोरा विमानतळ

टॅग्स :AirportविमानतळAmravatiअमरावती