शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
2
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
3
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
4
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
5
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
6
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
8
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
9
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
11
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
12
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
13
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
14
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
15
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
16
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
17
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
18
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
19
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
20
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा

महावितरणकडून घरगुती वीज बिल वसुलीचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

चांदूर बाजार : कोरोनाच्या भीषण संकटातून गोरगरीब सर्वसामान्य नागरिक अद्यापही सावरलेला नाही. असे असताना महावितरणने वीज बिल वसुलीचा सपाटा ...

चांदूर बाजार : कोरोनाच्या भीषण संकटातून गोरगरीब सर्वसामान्य नागरिक अद्यापही सावरलेला नाही. असे असताना महावितरणने वीज बिल वसुलीचा सपाटा लावला असल्याने ते चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, वीज बिल माफीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाची महाविकास आघाडी शासनाने दखल न घेतल्याने सर्वसामान्य विद्युत ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून मध्यमवर्गीय, व्यापारी, शेतकरी व शेतमजुरांना तसेच कामगारांना उद्योगधंदे बंद पडल्याने हातचा रोजगार हिरावला गेल्याने चांगलाच फटका बसला आहे. अशातच यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व पिकावर आलेल्या निरनिराळ्या रोगांमुळे सर्वच पिके शेतकºयांच्या हातातून गेली आहेत. हा काळ स्वत:ची काळजी घेऊन जिवंत राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा असतानाच दरम्यानच्या काळात घरगुती वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आले. याविरोधात अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. आघाडी शासनातील ऊर्जामंत्र्यांनी कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिल्याने अनेक सर्वसामान्य गरीब नागरिकांनी बिल भरले नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत बिल थकीत झाले. सद्यस्थितीत आर्थिक कारणांमुळे विद्युत बिल भरणे अवजड जात आहे. महावितरणने हप्त्याची रक्कम पाडून देऊनही वीज बिल भरण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

- तर फौजदारी कारवाई देखील

महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी थकीत वीज बिल भरण्यासाठी तगादा लावून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना संबंधित ग्राहकांना दिला जात आहे. घराचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या भीतीने सर्वसामान्य कुटुंबात आता चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाºयांना साधी विचारणादेखील केल्यास शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.