शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील विविध समस्या तात्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:28 IST

मेळघाटातील आदिवासींचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा. सुविधांअभावी त्यांना पुन्हा जंगलात यायला नको. या भागातील विविध समस्या तात्काळ समन्वयातून मार्गी लावा, असे निर्देश नागपूर येथील आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देधारणी उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचेकाटकुंभ परिसरासाठी ३३ केव्ही उपकेंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील आदिवासींचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा. सुविधांअभावी त्यांना पुन्हा जंगलात यायला नको. या भागातील विविध समस्या तात्काळ समन्वयातून मार्गी लावा, असे निर्देश नागपूर येथील आढावा बैठकीत आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिकाऱ्यांना दिले. धारणीत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, इतर प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, काटकुंभ परिसरासाठी कोयलारी येथे नवीन वीज उपकेंद्र आदी महत्त्वाचे मुद्दे गुरुवारी झालेल्या बैठकीत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासी विकास मंत्र्यांपुढे मांडले.नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, उपवनसंरक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धारणी येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मितीपासून केवळ ५० खाटांचे आहे. त्याची क्षमता आता शंभर खाटांची करावी. तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तात्काळ उपलब्ध करावी, असे आदेश ना. पाडवी यांनी दिले. प्रकल्प कार्यालयाच्या निर्मितीपासूनच १०० असलेली वसतिगृहांची पटसंख्या शंभरवरून दोनशे करण्यास मान्यता देत सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामसेवक, नर्स, कृषिसहायक आदी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वसतिगृह तात्काळ सुरू करा. इमारत नसेल, तर भाडेतत्त्वावर घ्या. आदिवासींचे स्थलांतर होऊ नये, यासाठी वनविभागांतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे ना. पाडवी यांनी सुचविले.मध्य प्रदेशातून ३३ केव्ही पुरवठा, सर्व गावांना वीजचिखलदरा तालुक्यातील जारिदा, काटकुंभ परिसराला मध्यप्रदेशातून होणारा ११ केव्ही विद्युत पुरवठा ६० गावांसाठी अपुरा आहे. आता येथे नवीन उपकेंद्राची निर्मिती करून ३३ केव्ही पुरवठा सुरू करण्यासंदर्भात महावितरणने तात्काळ हालचाली कराव्यात. वर्ष संपत असताना महावितरणकडे विकासकामांचा कोट्यवधींचा निधी पडून असल्याबाबत मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. मेळघाटातील ज्या गावांमध्ये अद्यापही वीजपुरवठा पोहोचला नाही, ती सर्व गावे तीन महिन्यांत प्रकाशमान करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले.मेळघाटातील रस्ते, वीज, वसतिगृह, उपजिल्हा रुग्णालय, पुनर्वसन या मुद्द्यांवर आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.- राजकुमार पटेल, आमदार मेळघाट विधानसभा

टॅग्स :Melghatमेळघाट