शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून पाच पर्यटक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST

फोटो - वीज २५ पी चिखलदरा : मेळघाट पर्यटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट येथे रविवारी ...

फोटो - वीज २५ पी

चिखलदरा : मेळघाट पर्यटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट येथे रविवारी दुपारी ३ वाजता वीज कोसळली. यात पाच पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने पर्यटनस्थळावर एकच खळबळ उडाली.

चिखलदरा येथे प्रत्येक वीकेंडला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. अमरावती येथील साबळे परिवारासह त्यांचे नातेवाईक पर्यटन सफारीला आले होते. मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ठाकूर (३०), ब्राह्मणे (५०) हे दोघेदेखील विजेच्या कडकडाटासह झालेल्या आवाजाने कमालीचे भेदरले होते. त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आवाजाने इतर सहकारीही भेदरल्याची माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यासंदर्भात चिखलदरा पोलीस ठाण्यात कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती.

बॉक्स

पर्यटनावर मुसळधार पाऊस, दाट धुके

गत तीन दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावून शनिवारी रात्रीसुद्धा धो-धो कोसळला. रविवारी पावसासह दाट धुके होते.

कोट

चिखलदरा येथील मोझरी पॉईंटवर वीज कोसळून काही पर्यटक जखमी झाल्याचे समजले होते. त्यासंदर्भात पोलिसात कुठल्याच प्रकारची माहिती आलेली नाही. माहिती घेणे सुरू आहे.

- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा

--------------मोझरी पॉईंटवर वीज कोसळल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन पर्यटकांना इजा पोहोचली. त्यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

- संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा