शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाच हजार एकरांतील पीक नष्ट

By admin | Updated: July 9, 2016 23:55 IST

जिल्ह्यात मागील २४ तासांत चांदूररेल्वे, चिखलदरा व धामणगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली.

तीन तालुक्यांत अतिवृष्टी : नदी-नाल्यांना पूर; खोलगट भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराअमरावती : जिल्ह्यात मागील २४ तासांत चांदूररेल्वे, चिखलदरा व धामणगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. या तालुक्यातील पाच हजार एकर शेतात पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहे. वर्धा नदीला पूर आल्याने वरूड ते पांढुर्णा मार्गावरील वाहतूक शुक्रवारी रात्री चार तास बंद होती. निम्न वर्धा व विश्रोळी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने खोलगट भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक वाढल्याने वर्धा नदी दुथडी वाहत आहे. धामणगाव तालुक्याील विदर्भा, तिवसा तालुक्यातील पिंगळा, धारणी तालुक्यातील सिपना नदीचे व परिसरातील नाल्यांचे पाणी काठालगतच्या शेतात शिरले आहे. तसेच संततधार पावसाने अनेक शेतात रातोरात तळी साचून पेरणी झालेली व पिके निघालेली शेती धोक्यात आली आहे. जिल्ह्यात गत २४ तासांत ५८.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १३२.४ मि.मी. धामणगाव, ८५.४ चिखलदरा व ८२.६ मि. मी. चांदूररेल्वे तालुक्यात पाऊस पडला ही अतिवृष्टी आहे. या खालोखाल ६४.२ अमरावती, भातकुली ३९.८. नांदगाव ६१.४, तिवसा ५१.२, मोर्शी ३९.१, वरूड ३७, अचलपूर ५५.३, चांदूरबाजार ५०, दर्यापूर २३, अंजनगाव ४२, धारणी ५७.२ व चिखलदरा तालुक्यात ८५.४ मि. मी. पाऊस पडला आहे. १ जून ते ९ जुलैदरम्यान २२६.३ मि.मी. पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात३२८.७मि.मी. पाऊस झाला. पावसाचा जोर कायम राहणारअमरावती : मध्यप्रदेशात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव थोडा कमी झाला असला तरी स्थिरता कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सर्वाधिक ४९८.४ मि.मी. पाऊस पडला. मोर्शी ४४७, धामणगाव ४०८.६, अमरावती २८३.५, भातकुली २३१.८ नांदगाव खंडेश्वर ३१०.५, चांदूररेल्वे ३६३.५, वरूड २८०.१, अचलपूर ३००.९, चांदूरबाजार ३५६.९, दर्यापूर २७२.८, अंजनगाव सुर्जी २५७.६ व चिखलदरा तालुक्यात ३३३.२ मि. मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पावसाची टक्केवारी १४५.३ आहे. यामध्ये अमरावती १३८, भातकुली १०५, नांदगाव १४१, चांदूररेल्वे १६७, धामणगाव १८९, तिवसा २३१.३, मोर्शी १९९.५, वरूड १०८, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७७, दर्यापूर १४४ व अंजनगाव तालुक्यात १५६ टक्के पाऊस पडला. या १२ तालुक्यांनी पावसाची टक्केवारी पार केली. चिखलदरा ९३०५ व धारणी ९४.३ हे तालुक्ये सरासरीत आहेत. धामणगाव तालुक्यातील शेती पाण्याततालुक्यात दोन दिवसांपासून पडलेल्या संततधार पावसाचे पाणी सुमारे दीड हजार हेक्टरमध्ये साचले. मात्र महसूल प्रशासनातील गावांचा मुख्य दुवा असलेला तलाठी बेपत्ता झाला आहे़ हजारो रूपयांचे बियाणे पेरणी केल्यानंतर पीक बुडाल्याने सर्व्हेक्षण कोण करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे. तहसीलदार चंद्रभान कोहरे यांनी सर्व तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सूचना दिली असतानादेखील अनेक गावात तलाठी उपस्थित नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पाणी साचलेल्या शेतीचे सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे़ या शेतकऱ्यांनी हजारो रूपयांचे बियाणे शेतात टाकले व आता पावसामुळे आपल्या शेतातील बियाणेच नव्हेतर पिकेदेखील पाण्याखाली आली. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची आस लागली आहे़वरूड-पांढुर्णा राज्य मार्ग चार तास बंदमध्यप्रदेशात झालेली अतिवृष्टी व तालुक्यात गेल्या ४८ तासात झालेला संततधार पाऊस यामुळे वरूड तालुक्यात वर्धा नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. त्यामुळे मध्यप्रदेशात जाणारा वरुड पांढुर्णा मार्गावरची वाहतूक चार तास ठप्प होती. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील राजुराबाजार राजस्व मंडळातील ७ घरांची अशंत: पडझड होऊन नुकसान झाले, तर बेलोरा परिसरातील शेतीचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोणी मंडळामध्ये ४ हेक्टर ९० आर. शेतीचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. राजुरा राजस्व मंडळातील हातूूर्णा , आलोडा, आणि नांदगाव परिसरातील ७ घरांची अंशत: पडझड झाली. तर लोणी मंडळातील बेलोरा परिसरातील ४ हेक्टर ९० आर. शेतजमिनीचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले.विश्रोळी धरणाचे नऊ दरवाजे उघडलेदोन दिवसांपासून धरणक्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने चांदूरबाजार तालुक्यामधील विश्रोळी धरणाचे ९ दरवाजे १० सें.मी. ने उघडले आहे. तसेच वर्धा नदीला पूर असल्याने निम्नवर्धा धरणाचेदेखील दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.दोन दिवस झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. तेथील सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वेमध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने वर्धा नदी दुथडी वाहत आहे. जिल्ह्यात काही तास खंड देऊन पाऊस होत असल्याने पिकाचे एवढे नुकसान झालेले नाही.- किरण गित्ते,जिल्हाधिकारी, अमरावतीशेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावयास पाहिजे. २४ तासांवर पाणी शेतात साचले सअल्यास पिके पिवळी पडू शकतात. पाणी साचल्याने पिकांची मुळे सडतात. यासाठी पाण्याचा निचरा करून नजिकच्या कृषी कार्यालयात सल्ला घ्यावा.- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी