शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे ठरली, स्थानिक एकही पात्र नाही

By गणेश वासनिक | Updated: January 15, 2024 18:35 IST

डॉ. मिलिंद बाराहाते, ए. एम. महाजन, वाणी लातूरकर, रामचंद्र मंठाळकर आणि राजेश गच्चे यांचा समावेश

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूपदासाठी ‘शॉर्ट लिस्ट’नुसार ४३ उमेदवारांपैकी अंतिम पाच नावे निश्चित करण्यात आली आहे. या पात्र पाच उमेदवारांना राजभवनातून २० जानेवारी रोजी होऊ घातलेल्या मुलाखतीसाठी शनिवारी ई-मेल पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

यात मिलिंद बाराहाते (नागपूर), ए. एम. महाजन (नांदेड), रामचंद्र मंठाळकर (नांदेड), ए. एम. महाजन (जळगाव) आणि राजेश गच्चे (पुणे) या पाच उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कुलगुरू निवड समितीने ११ व १२ जानेवारी रोजी घेतलेल्या ४३ उमेदवारांच्या यादीत अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनेक जण कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. मात्र, अंतिम पाचउमेदवारांच्या यादीत अमरावती विद्यापीठ अंतर्गत एकही नाव न आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या २० जानेवारी रोजी राजभवनात राज्यपाल रमेश बैस हे पाच उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून, अमरावतीचे नवे कुुलगुरू कोण? हे ठरवतील.नागपूरकर डॉ. मिलिंद बाराहाते मेरिटवर?नागपूर येथील सी. पी. ॲन्ड बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद बाराहाते हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नववे कुलगुरू म्हणून मेरिटवर आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते व्यवस्थापन परिषद तथा अधिनियम समितीवरही होते. कॉलेजच्या एम.बी.ए. विभागात ते समन्वयकपदी दहा वर्ष कार्यरत हाेते. यापूर्वी नागपूरचे डॉ. मुरलीधर चांदेकर यानंतर आता डॉ. मिलिंद बाराहाते हे अमरावतीचे नवे कुलगुरू हाेतील, अशी विश्वसनीय माहिती आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती