शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

जिल्हा परिषदेच्या पाच खातेप्रमुखांना ‘शो-कॉज’

By admin | Published: August 23, 2016 11:59 PM

जिल्हा परिषदेतील पाच विभागांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांची जुलै महिन्याची वेतन देयके कोषागारात सादर केलेली नाहीत.

सीईओंचा दणका : एक तारखेला वेतन न देणे भोवलेअमरावती : जिल्हा परिषदेतील पाच विभागांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांची जुलै महिन्याची वेतन देयके कोषागारात सादर केलेली नाहीत. याशिवाय पंचायत राज सेवार्थ प्रणालीअंतर्गत वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्याचे आदेश आहेत. मात्र, यात दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्याने नवनियुक्त सीईओ किरण कुलकर्णी यांनी २० आॅगस्ट रोजी पाच विभागांच्या खातेप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावली आहे. जिल्हा परिषदेतील बांधकाम, शिक्षण, कृषी, आरोग्य आणि सिंचन या पाच विभागातील वर्ग ३ आणि ४ मधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन १ तारखेला होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाचेही तसे आदेशही आहेत. पंचायत राज सेवार्थ प्रणालीव्दारे वेतनाची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मात्र, उपरोक्त पाचही विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके संबंधित विभागाने जिल्हा कोषागारात सादर केली नसल्याने याबाबत वित्त विभागाकडून माहिती घेतली असता निदर्शनास आले.पाचही विभागांनी देयकांचे अद्यापही एमटीआर ४४ सुद्धा काढले नसल्याचे उघड झाले. ही देयके कोषागारात पाठविण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. देयकांच्या विलंबासंदर्भात संबंधित विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी व कर्मचारी यांना मुख्यकार्यकाऱ्यांनी विचारणा केली असता ते समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. कर्मचाऱ्यांना दरमाह १ तारखेला वेतन अदा करण्याची जबाबदारी खातेप्रमुखांची आहे. यासाठी खातेप्रमुखांनी वेळेपूर्वी देयके कोषागारातून पारित करून १ तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन देणे गरजेचे आहे. मात्र, वेळेवर वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न होणे ही बाब गंभीर असून प्रशासकीय कारवाईस पात्र ठरते. याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम, सिंचन विभागाच्या कार्यकारीचे अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी या पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आठवडाभरात वेतन देयकांच्या विलंबाप्रकरणी खुलासा सादर करण्याचेदेखील सुचविले आहे. (प्रतिनिधी)