व्याज व विलंब आकाराच्या शंभर टक्के माफीसह सुधारित थकबाकीतही ५० टक्के माफी असणाऱ्या या धोरणाचा फायदा परिमंडळातील, २ लक्ष ५७ हजार ५७७ ग्राहकांना होणार आहे. या ग्राहकांकडे असलेल्या एकूण २,७५८ कोटी थकबाकीपैकी निर्लेखन, व्याज व विलंब आकाराची १,०६७ कोटी ४७ लक्ष रुपयांची सूट महावितरणकडून देण्यात आली आहे. पहिल्या वर्षी जर ग्राहक या कृषी धोरणात सहभागी झाले तर १,६९० कोटींच्या मूळ थकबाकीवरही ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याने परिमंडळातील ग्राहकांना तब्बल ८४५ कोटींची माफी मिळणार आहे. परिमंडळात आतापर्यंत ८,४०५ ग्राहक या धोरणात सहभागी झाले आहे. त्यांनी व्याज व विलंब आकार सोडून फक्त मूळ थकबाकीपैकी ५० टक्के म्हणजे ५ कोटी ३६ लक्ष रुपये भरल्याने त्यांना तत्काळ ५ कोटी ३६ लक्ष रुपयांची माफी देण्यात आली आहे. या धोरणांतर्गत चालू वीजबिल भरणे बंधनकारक असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी २ कोटी ९२ लक्ष रुपयांचे कृषिपंपाचे चालू देयके भरून वीजबिल कोरे करून घेतले आहे. राज्याचा महावितरणच्या चारही प्रादेशिक विभागात महावितरणच्या कृषी धोरणाचा सर्वात जास्त माफीचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या धोरणांतर्गत पुणे विभागात १ लक्ष ३० हजार ८४३ ग्राहकांकडून २२६ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.
परिमंडळातील आठ हजार शेतकऱ्यांना पाच कोटींचे वीजबिल माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST