शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात वीज पडून अमरावतीचे पाच पर्यटक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:01 IST

मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ठाकूर (३०), ब्राह्मणे (५०) हे दोघेदेखील  विजेच्या कडकडाटासह झालेल्या आवाजाने कमालीचे भेदरले होते. त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट पर्यटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात चिखलदऱ्यातील मोझरी पॉईंट येथे रविवारी दुपारी ३ वाजता वीज कोसळली. यात पाच पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने पर्यटनस्थळावर एकच खळबळ उडाली.चिखलदरा येथे प्रत्येक वीकेंडला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. अमरावती येथील साबळे परिवारासह त्यांचे नातेवाईक पर्यटन सफारीला आले होते. मोझरी पॉईंट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा धक्का लागला. त्यामध्ये किशोर मोतीराम साबळे (५५), वैशाली किशोर साबळे (२६), आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ठाकूर (३०), ब्राह्मणे (५०) हे दोघेदेखील  विजेच्या कडकडाटासह झालेल्या आवाजाने कमालीचे भेदरले होते. त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आवाजाने इतर सहकारीही भेदरल्याची माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यासंदर्भात चिखलदरा पोलीस ठाण्यात कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती. 

पर्यटन स्थळावर मुसळधार पाऊस, धुकेगत तीन दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावून शनिवारी रात्रीसुद्धा धो-धो कोसळला. रविवारी पावसासह दाट धुके होते. 

चिखलदरा येथील मोझरी पॉईंटवर वीज कोसळून काही पर्यटक जखमी झाल्याचे समजले होते. त्यासंदर्भात पोलिसात कुठल्याच प्रकारची माहिती आलेली नाही. माहिती घेणे सुरू आहे. - राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा

मोझरी पॉईंटवर वीज कोसळल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन पर्यटकांना इजा पोहोचली. त्यांच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. - संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा

 

टॅग्स :Chikhaldaraचिखलदराtourismपर्यटन