शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

१७८६ शासकीय शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी 'पहिले पाऊल', २३ एप्रिलचा मुहूर्त; आठवडाभर राबविणार मोहीम

By जितेंद्र दखने | Updated: April 20, 2023 18:57 IST

पहिलीच्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पाऊल हा खास कार्यक्रम होणार आहे. 

 अमरावती : पहिलीच्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिले पाऊल हा खास कार्यक्रम होणार आहे. राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता वाढीसाठी निपुण महाराष्ट्र अभियान जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १ हजार ७३९ शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. सर्व शाळांमधील शाळापूर्व तयारी पहिला मेळावा २३ ते ३० एप्रिल या दरम्यान तसेच दुसरा मेळावा  जुनच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार आहे.

 या काळात शालेय, महिला बालविकास आणि सहभागी घटकांनी पहिले पाऊल शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेट देऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपुण महाराष्ट्र निपुण भारत या अभियानांतर्गत ३ ते ९ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी यापूर्वीच कार्यक्रम राबविले जात आहेत. जे विद्यार्थी शाळांमध्ये पहिले पाऊल टाकतील, त्यांचीही शाळांमध्ये येण्यापूर्वी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान यावे यासाठी पहिले पाऊल हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात २०२३-२४ साठी आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी, या प्रत्येक दाखल पात्र मुलांना शाळापूर्व तयारीसाठी पहिले पाऊल प्रत्येक वाडी, वस्तीवर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचापहिले पाऊल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील विविध घटकांच्या सहभागातून तसेच माता गटांच्या सहभागातून पहिला मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन जूनच्या माता-पालकांना, मुख्याध्यापक व गामस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी पहिला मेळावा एप्रिल अखेर व दुसरा मेळावा २१ जूनमध्ये आयोजित केला जाणार आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालक करून घेणार आहेत. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा