शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे तिवस्यात पहिले पाऊल

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

तिवस्यात नवीन दवाखान्याची सुसज्ज इमारत, शासकीय ट्रॉमा केअर युनिट व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी म्हणजे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे विदर्भात पडलेले हे पहिलेच पाऊल असल्याचे प्रतिपादन

अमरावती : तिवस्यात नवीन दवाखान्याची सुसज्ज इमारत, शासकीय ट्रॉमा केअर युनिट व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी म्हणजे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे विदर्भात पडलेले हे पहिलेच पाऊल असल्याचे प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. सर्वांगीण विकास हा जनहित जोपासूनच करण्यात आलेला आहे व भविष्यात मतदारसंघातील मूलभूत समस्या आणि गरजा सोडविण्यासाठी माझी तत्परता कायम राहील, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्यात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी विकास आराखडा अंतर्गत तिवसा व यावली येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच रस्त्यांचा लोकार्पण समारंभ थाटात पार पडला. तिवसा येथे दवाखान्याची सुसज्ज इमारत, तिवसा तालुक्यात अत्यंत गरजेचे शासकीय ट्रॉमा केअर युनिट व सुसज्ज क्रीडा संकुल असे १२.५० कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, उपविभागीय अभियंता नागपूरकर, तहसीलदार लोखंडे, पं.स. सभापती देवीदास डेहणकर, आरोग्य अधिकारी शुभांगी नरवाडे यांची उपस्थिती होती. क्रीडा संकुलामुळे खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ तसेच अत्यावश्यक रुग्णसेवेला बळकटीकरण हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे उद्गार विभागीय आयुक्त यांनी यावेळी केले.