शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पहिली फेरी, सरनाईक ६०८८, देशपांडे ५१२२, भोयर ४८८९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:35 IST

अमरावती : शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना सर्वाधिक ६,०८८ ...

अमरावती : शिक्षक मतदारसंघासाठी गुरुवारी सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना सर्वाधिक ६,०८८ मते मिळाली. विद्यमान आमदार व महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५,१२२ व अन्य अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना ४,८८९ मते मिळाली. विजयासाठी १४,९१६ मतांचा कोटा निश्चित झाल्याने आता दुसऱ्या क्रमांकाच्या मतांसाठी रात्री उशीरापर्यंत चांगलीच रस्सीखेच होणार आहे.

येथील विलासनगरातील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दोन हॉलमधील १४ टेबलवर प्रत्येकी २५ मतांचे ४० गठ्ठे मोजणीसाठी देण्यात आले. पहिल्या फेरीतील मतपत्रिकांच्या तपासणीत ४८८ मते अवैध ठरल्याने उरलेल्या १३,५११ मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये सर्वांना धक्का देत अपक्ष उमेदवार सरनाईक यांनी ३,१३१ मते घेत देशपांडे यांच्यावर ८३१ मतांची आघाडी मिळविली. या फेरीत देशपांडे यांना २,३००, तर भोयर यांना २,०७८ मते मिळाली. पहिल्या फेरीची मते जाहीर व्हायला दुपारचे ३.३० वाजले. त्यानंतर उरलेल्या मतांच्या मोजणीसाठी दुसरी फेरी सुरू झाली. या फेरीचा निकाल जाहीर व्हायला रात्रीचे ८ वाजले. या फेरीतही ६०१ मते अवैध ठरल्याने एकूण १,०८९ मते बाद झालीत व २९,८२९ मते वैध ठरली. त्यामुळे विजयासाठी १४,९१६ मतांचा कोठा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जाहीर केला.

यानंतर रात्री ९ वाजतापासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. यामध्ये सर्वात कमी असलेल्या उमेदवाराच्या दुसऱ्या क्रमाकांची मते मोजण्यात येऊन या उमेदवाराला बाद करण्यात येणार आहे. असाच क्रम आता विजयी मतांचा कोटा मिळेपर्यंत सुरू राहील व शेवटपर्यंत एकाही उमेदवाराला निश्चित कोट्याएवढी मते न मिळाल्यास सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले. यापूर्वी सन २०१४ हीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा विजयी मतांचा कोटा कोण मिळवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या दोन फेरीतील मते

किरण सरनाईक ६०८८, श्रीकांत देशपांडे ५१२२, शेखर भोयर ४८८९, संगीता शिंदे २,८५७ अविनाश बोर्डे २४४७, नितीन धांडे २१२७, नीलेश गावंडे २१२२, प्रकाश काळबांडे १२१९, दिलीप निंबोरकर ५५५, विकास सावरकर ६२५, राजकुमार बोनकीले ५७२, महेश दवरे २९०, अरविंद तट्टे ७९, सुनील पवार ५६, शरदचंद्र हिंगे ५४, अनिल काळे २६, अभिजित देशमुख २३, तनवीर आलम २६, संजय आसोले १०४, उपेंद्र पाटील ३५, सतीश काळे ८९, दिपंकर तेलगोटे १६, प्रवीण विधळे १६, मुस्ताक शहा २५, विनोद मेश्राम १५, मोहम्द शकील ३२, श्रीकृष्ण ठाकरे यांना २० मते मिळाली.

बॉक्स

गुरुजींची १,०८९ मते अवैध

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३०,८६९ मतदान झाले. या मतांच्या तपासणीत तब्बल १,०८९ मते अवैध ठरविण्यात आली, ही ३.६५ टक्केवारी आहे. निवडणूक विभागाद्वारा मतदान कसे करावे याविषयी सातत्याने जनजागृती करण्यात आल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येनी मतदान अवैध ठरले आहे.