शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस नटला नवलाईने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:03 IST

नवीन दप्तर, नवीन वहया, पुस्तके, नवा युनीफार्म नवे मित्र,मैत्रिणी यांच्या जोडीला शाळा परिसरात प्रभात फेऱ्या अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.शाळामध्ये विद्यार्थ्याना मोफत पाठपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.

ठळक मुद्देशाळा झाल्या सुरू : झेडपी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

अमरावती : नवीन दप्तर, नवीन वहया, पुस्तके, नवा युनीफार्म नवे मित्र,मैत्रिणी यांच्या जोडीला शाळा परिसरात प्रभात फेऱ्या अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.शाळामध्ये विद्यार्थ्याना मोफत पाठपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये उत्साहवर्धक वातावरण होते.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पालकांसह विद्यार्थ्याचे रोपटे देऊन जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याच्या हस्ते स्वागत करण्यात आले.नवप्रवेशित मुलांचे अनोखे स्वागत, पुष्पवर्षावशाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्या सजविल्या. फुलांच्या पाकळ्यांच्या पदस्पर्शानंतर ताटातील रंगात पाय भिजवून पाऊलखुणा कागदावर उमटविल्या. हा आगळा उपक्रम महापालिकेच्या वडाळीस्थित एसआरपीएफ शाळेत मंगळवारी राबविण्यात आला. मुलांचे शाळेतील पहिले पाऊल पडताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले. मुलांच्या पाऊलखुणांचा तो कागद पालकांना भेट देण्यात आला. शाळा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहून पालकवर्ग गहिवरले. या नवख्या उपक्रमासाठी नगरसेवक आशिष गावंडे, मुख्याध्यापिका प्रिति खोडे, योगेश पखाले, राहुल तायडे, योगेश चाटे, उज्वला भिसे यांनी परिश्रम घेतले असून शाळेचा पहिला दिवस पालकांकरिता चिरस्मरणीय बनविला होता.लोकप्रतिनिधींचाही सहभागविद्यार्थ्यांचे स्वागतासाठी झेडपी अध्यक्ष,नितीन गोंडाणे,आ. वीरेंद्र जगताप यांनी मांजरखेड येथील शाळेत तर उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,शिक्षण सभापती जयंत देशमुख, आदीसह सीईओ मनिषा खत्री प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके आदीनी शाळेच्या पहिल्या दिवशी अमरावती तालुक्यातील पुसदा येथे कार्यक्रमात सहभाग घेतला.