शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत नभांगणात चार दिवस उल्कांची आतषबाजी!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 7, 2023 18:55 IST

सिंह तारकासमूहातून १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार उल्का वर्षाव.

गजानन मोहोड

अमरावती : अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना एखाद्यावेळी क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना दिसते. या घटनेस तारा तुटला असे आपण म्हणतो. ती प्रकाशरेषा तारा तुटल्याची नसते. किंबहुना तारा कधी तुटत नसतो. तर ती एक खगोलीय घटना आहे. या घटनेला उल्का वर्षाव म्हणतात. १७ ते १९ नोव्हेंबरच्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त आहे. या खगोलीय घटनेमुळे आकाशात चार दिवस दिवाळी राहणार असल्याचे म्हटले जाते.

या चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर पडले आणि भराभर उल्का पडताना दिसल्या, अशी अवास्तव कल्पना करून घेऊ नये. उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी यांची खगोल जगतात खूप गरज असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. सर्व खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमराती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.‘टेम्पलटटल’या धुमकेतूच्या अवशेषामुळे उल्का वर्षावज्यावेळी एखादी उल्का आपल्याला पडताना दिसते, यासंदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. परंतु, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेच थारा नाही. सिंह तारकासमूहातून होणारा उल्का वर्षाव हा ‘टेम्पलटटल’या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. उल्का वर्षाव साध्या डोळ्यांनी मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवर किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल.काय आहे उल्का वर्षाव?१) धूमकेतू सूर्याला प्रदक्षिण घालत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष आहेत. या उल्का एखाद्या तारका समूहातून येत आहेत असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात.२) काहीवेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास अशनी म्हणतात. उल्काशास्त्रात अशनीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तूचे नमूने या अशनीमूळे आपणास पाहावयास मिळतात. त्यामुळे वस्तूच्या जडणघडणीचा अर्थ लावता येतो.

टॅग्स :Amravatiअमरावतीscienceविज्ञान