शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

सुकळी कंपोस्टची आग ग्रामस्थांच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:47 IST

सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे.

ठळक मुद्देजनआंदोलनाचा इशारा : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुकळी कंपोस्ट डेपोतील कचऱ्याला लागलेली आग पंधरवडापासून धुमसत आहे. त्यातून निघणाऱ्या घातक तथा विषारी धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. त्याअनुषंगाने तीन दिवसांत तेथील कचरा विलगीकरण प्रक्रिया करावी, अन्यथा उसळणाऱ्या जनआंदोलनाला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सुकळी व लगतच्या ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.निविदानानुसार, सुकळी कंपोस्ट डेपोची कचरा साठवणुकीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आली असताना तेथे रोज ३०० टन कचरा विनाप्रक्रिया टाकला जात आहे. त्यात घरगुती कचऱ्यासह प्लास्टिक, ओला व सुका कचरा, जैववैद्यकीय कचरा, ब्लेड, सॅनिटरी नॅपकिन, डायपरचा समावेश आहे. तेथे कचऱ्याचा डोंगर साचला असून त्याला वारंवार आग लागत आहे. आग आणि धुरातून निघणाऱ्या विषारी वायुमुळे सुकळीसोबतच अमरावती शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. हवा प्रदूषित झाली असून, स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबाबत १७ आॅक्टोबरला पर्यावरणस्रेही नंदकिशोर गांधी यांनी महापालिकेस निवेदनही दिले. सोबतच सुकळी कंपोस्ट डेपोलगत ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांनीही निवेदन दिले. मात्र महापालिकेकडून अद्यापही सुकळी कंपोस्ट डेपो, तेथील आग व अन्य प्रश्न सोडविता आले नाहीत. २५ आॅक्टोबर रोजी पुन्हा आयुक्तांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालकमंत्री तथा महापौरांना निवेदन दिल्याची माहिती मो. अकील यांनी दिली. तीन दिवसांत सुकळी कंपोस्ट डेपोतील कचरा विलगीकरण व प्रक्रिया करावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा मो. शकील, राममिलन वर्मा, सादिक शहा, मो. अफसर, वि.दा.पवार आदींनी आयुक्तांना निवेदानातून दिला आहे. प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम २०००, २००६ व २०१६ ची पायमल्ली चालविली आहे.