शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण वडाळी जंगलात आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:09 IST

नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते.

ठळक मुद्देआठ तास धग : वनकर्मचाऱ्यांची आग विझविण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते. या आगीमागे घातपाताचा संशय असल्याचा अंदाज वनाधिकाºयांनी वर्तविला आहे.यंदा उन्हाळ्यात वडाळी, पोहरा, चिरोडी जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, बुधवारी दक्षिण वडाळी, जेवड बीटमध्ये लागलेली आग ही सहावी घटना असल्याची नोंद करण्यात आली आहे. वडाळी जंगलात वाघ वगळता अन्य वन्यपशू, पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वडाळी जंगलात अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे दुर्मिळ वृक्षांना झळ पोहचली आहे. या आगीत वन्यजीवांचे नुकसान झाल्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. आगीने तीन ते चार टेकड्यांना वेढले होते. सागवान, वड, पिंपळ, चिंच आदी प्रजातीच्या वृक्षांना आगीने लक्ष्य केल्याचे दिसून आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत वनमजुरांना कसरत करावी लागली. ब्लोअरच्या सहाय्याने वनकर्मचाºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात सुसाट वारा असल्याने आग वाढतच गेली. रात्री ९ वाजपर्यंत वनमजूर जंगलात आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. गुराखी किंवा अवैध वृक्षतोड करणाऱ्यांनी जंगलात आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.चौकशीअंती पुढे येईल वास्तवया आगीत किती वन्यजीवांचे मृत्यू झाले, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. या भीषण आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याची वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशी झाल्यानंतरच वास्तव पुढे येईल, अशी माहिती एका वनाधिकाºयांनी दिली.

टॅग्स :fireआग