शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

आगीत दहा झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:42 IST

वलगाव मार्गालगतच्या रॉयल पॅलेसजवळील परिसरात वसलेल्या तब्बल दहा झोपड्या शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे कामगारांची दहा कुटुंबीये उघड्यावर आली आहेत.

ठळक मुद्देवलगाव मार्गावरील घटना : अग्निशमनच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वलगाव मार्गालगतच्या रॉयल पॅलेसजवळील परिसरात वसलेल्या तब्बल दहा झोपड्या शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे कामगारांची दहा कुटुंबीये उघड्यावर आली आहेत.वलगाव मार्गालगतच्या या परिसरात काही कामगारांनी लहान झोपड्या बांधून वास्तव सुरू केले आहे. या परिसरात ४० च्यावर झोपड्या बांधून कामगार जीवन कंठत आहेत. त्यामध्ये विविध ठिकाणच्या कामावरील मजूर वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी अचानक रामपाल बेलकार नामक मजुराच्या झोपडीला आग लागली. या झोपड्या खुल्या परिसरात असल्यामुळे एका झोपडीपासून दुसऱ्या झोपडीपर्यंत आग सहजरीत्या पसरली. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान काही वेळातच आगीने तब्बल दहा झोपड्यांना विळख्यात घेतले. अग्निशमनचे उपक्रेंद्रप्रमुख सैय्यद अनवर यांच्या पथकातील उपासे, हाजी खान, खर्चान यांच्यासह मुख्य केंद्राचे फायरमन व अन्य कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रण आणण्याकरिता पाण्याचा वर्षाव करीत आग जिकरीचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले. मात्र, या आगीत दहा झोपड्या जळून खाक झाल्यात. या गरीब कामगारांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.या घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेसह वलगाव पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न चालविले. प्रशासकीय मदत मिळण्याची अपेक्षा कामगारांची आहे, मात्र, अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा मदतीसाठी पोहोचली नव्हती. या आगीचे निश्चीत कारण कळू शकले नाही.