फोटो - रिद्धपूर ०७ एस
रिद्धपूर : नजीकच्या कोळविहीर रेल्वे स्थानकाच्या जमिनीवर मंगळवारी लागलेल्या आगीत वृक्षारोपण जळून गेले. रोहयोतून लागवड केलेली ही झाडे तीन वर्षांची झाली होती.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामावर मोर्शी मार्गावर वृक्षारोपण करणाऱ्या मजुरांनी सकाळी कामावर आल्यानंतर आग पाहिली. त्यांनी
ग्रामरोजगार सेवक मदन वाहने यांनाकॉल केला. त्यांनी तातडीने घटटनास्थळी दाखल होऊन मजुरांच्या मदतीने दुपारी ३ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.
कोळविहीर शिवारात रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या राखीव जागेवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून सीताफळ, नीलगिरी, कडुनिंब, कडू बदाम, बाभूळ अशा वृक्षांची लागवड २५ एकरांत करण्यात आली होती. त्यालगत असलेल्या शेताचा धुरा शेतकऱ्याने पेटविल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे अंदाजे आठ एकर परिसर आगीच्या कचाट्याने आल्याने तीन वर्षांची झालेली झाडे व शासनाने त्यांच्या संगोपनासाठी केलेला लाखोंचा खर्च
वाया गेला आहे. आगीची आच पोहोचलेली मोठी झाडे काही प्रमाणात जगतील, मात्र रोपे खाक झाली आहेत.