शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

झटामझिरी येथे आगीत आठ घरे बेचिराख

By admin | Updated: May 9, 2015 00:35 IST

तालुक्यातील झटामझिरी येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आदिवासींची आठ घरे ....

आदिवासी कुटुंब बेघर : शासनाकडून मदतीची अपेक्षा, दोन लाखांची हानीवरुड : तालुक्यातील झटामझिरी येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने आदिवासींची आठ घरे बेचिराख झाली. ग्रामस्थांनी सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. आगीची माहिती वरुड आणि शेंदूरजनाघाट येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. परंतु पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग फोफावली होती. आगीतून ८० वर्षाच्या अंध वृध्दाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. आगीमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले.प्राप्त माहितीनुसार, झटामझिरी-तिवसाघाट मार्गावर आदिवासी कुटुंबाची वस्ती आहे. घटनेच्या वेळी सर्व मोठी माणसे कामावर गेली होती. मुले खेळत होती. एका घरात आंधळा वृध्द होता. अशावेळी आगीमुळे हलकल्लोळ झाला. गावातील युवकांनी आग विझविण्याकरिता पुरेपूर प्रयत्न केले. परंतु पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निकांडात आठ घरे बेचिराख झालीत. यामध्ये हरिभाऊ जिवतू धुर्वे, रामबती उईके, रिमा शेषराव सिरसाम, विठ्ठल कोहलू तिडगाम, सुखदेव चयतू सरयाम, सुरेश मडांगे, पांडू साहेबलाल धुर्वे, रामचंद्र कमलसिंग धुर्वे यांच्या घराचा समावेश आहे. या आगीत अन्नधान्य, कपडे, तसेच टीव्ही संच, सायकली आणि मुलांची पुस्तके यांसह काही घरातील रोख रक्कम जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वरुड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे सुरेश नरहरे, कृष्णा खोडस्कर, हरिभाऊ थेर तसेच शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीनंतर आदिवासी कुटुंबांमध्ये विदारक परिस्थिती असून शासनाकडून अग्निग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. आदिवासी कुटुंब बेघर झाले आहेत. अंध वृध्दाला जीवदान घरातील मंडळी मजुरीच्या कामाला गेली असता घरात ८५ वर्षीय साहेबराव धुर्वे एकटेच होते. अचानक घरातून धूर निघू लागला. थोड्याच वेळात घराने पेट घेतला. पेटत्या घरात वृध्द तडफडत होता. गावातील युवकांनी वृध्दाला आगीतून बाहेर काढले. या धाडसासाठी युवकांचे कौतुक केले जात आहे.