शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर रोडवरील कापड प्रतिष्ठानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:07 IST

जवाहर रोड स्थित सारथी मेन्सवेअरच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे महागडे कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमुळे व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देतासाभरानंतर आग नियंत्रणात : लाखोंचे कपडे, साहित्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जवाहर रोड स्थित सारथी मेन्सवेअरच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे महागडे कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमुळे व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.जवाहर रोडवर सर्वाधिक व्यापारी प्रतिष्ठाने असून, ती सर्व एकमेकांना खेटून आहेत. मंगळवारी सकाळी सारथी मेन्सवेअरच्या दुसºया माळ्यावरून अचानक आगीचे लोळ बाहेर पडताना तेथील चौकीदार रतनसिंह लोहार यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देऊन तात्काळ मालक महेश टेकचंद पिंजाणी यांना कळविले. घटनेच्या माहितीवरून काही वेळातच अग्निशमनचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण, फायरमन सैयद अन्वर यांच्यासह पथकाने पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. त्यावेळी सारथी मेन्सवेअरच्या दुसºया मजल्यावर आगीचे भीषण स्वरूप दृष्टीस पडले. त्यांनी तात्काळ आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे जवाहर मार्गावरील व्यापाºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आगीवर लवकरच नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठी हानी टळली. तरीसुद्धा या आगीत सारथी मेन्सवेअरमधील महागडे कडपे व अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालकाने वर्तविला आहे.