शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

२६ सावकारांवर ‘एफआयआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:11 IST

जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले.

ठळक मुद्देअधिनियमाचे उल्लंघन : कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप, संबंधित ‘एआर’ फिर्यादी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ४ चे उल्लंघन झाल्याने सहकार आयुक्तांच्या आदेशान्वये संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधकांनी पोलीस ठाण्यात या विषयीची तक्रार नोंदविली. ही प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या सर्व सावकारांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहे.सावकारग्रस्त शेतकरी समितीचे राज्याध्यक्ष अरुण इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सावकारांचे परवाने नूतनीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत रिट याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्यावतीने या याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले. या विषयाच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकास तत्काळ अहवाल मागितला होता.शासनाने १० एप्रिल २०१४ रोजी शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी करताना लेखापरीक्षकांनी सावकारांद्वारा सादर केलेल्या यादीची तपासणी केली होती. यामध्ये बऱ्याच सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही. या सावकारांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम ४ चे हे सरळसरळ उल्लंघन असल्यामुळे अधिनियमाचे कलम ४१ (ख) व ४८ (क) नुसार गुन्हास पात्र असल्याने या सर्व सावकारांना सात दिवसांच्या आत खुलासा मागितला होता तसेच या सर्व सावकारांचे परवाने रद्द का करण्यात येऊ नये, या विषयीचा प्रस्तावदेखील जिल्हा उपनिबंधकाकडे पाठविला व याच अनुषंगाने संबंधित तालुक्याचे सहायक निबंधकांनी या अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक सावकारांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यात. त्यामुळे जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांविरोधात अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.सर्वाधिक नऊ सावकार तिवसा तालुक्यातीलजिल्ह्यात २६ सावकारांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला. यामध्ये सर्वाधिक नऊ सावकार तिवसा तालुक्यातील आहेत. यामध्ये सुनील गोमासे, मुकूंद उदापुरे, विजय मांडळे, कमलाकर विंचूरकर, वसंता अष्टुनकर, ज्ञानेश्वर पाचकवडे, संजय मांडळे, गोपाल हिमाणे व यशवंत वर्मा, तर चांदूरबाजार तालुक्यातील अजय अग्रवाल यांचा समावेश आहे.अमरावती तालुक्यात किरण विंचूरकर, अभय खोरगडे, सुनील जव्हेरी, रामदास इंगोले, शंकर पंचवटे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात नितीन लोणकर, भानुदास लोणकर, अतुल दानेज, संंदीप वर्मा, गजेंद्र बैतुले, अचलपूर तालुक्यात विलास काशीकर, गोविंदसा काशीकर, दर्यापूर तालुक्यात सचिन हिरूळकर, रामेश्वर लेंघे, रमेश लोणकर, विकास पाटील यांचा समावेश आहे.अशी आहे शिक्षेची तरतूदमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे नियम ३९ नुसार जी कोणी व्यक्ती वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करीत असेल, त्या व्यक्तीला दोष सिद्ध झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या कोणत्याही प्रकारच्या कारावासाची किंवा या दोन्ही शिक्षा करण्यात येतील व कलम ४८ (क) अन्वये शिक्षाप्राप्त अपराध हे दखलपात्र अपराध असतील, असे अधिनियमात नमूद आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी