शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ पत्नीच्या फोटोवर करायचा फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 22:05 IST

पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला.

ठळक मुद्देआरोपीकडून देशी कट्टा जप्त : केवल कॉलनीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला. मंगळवारी पोलिसांनी संजय वसंत दळवी (३५,रा.शेगाव, अमरावती) याला देशी कट्टा विक्री करण्याच्या बेतात असताना अटक केली आणि त्याच्याजवळील देशी कट्टा जप्त केला आहे.शेगाव परिसरातील रहिवासी संजय दळवी केवल कॉलनीत नागरिकांना देशी कट्टा विक्री करीत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अरुण कोडापे, पोलीस शिपाई अहमद अली, विक्की नशिबकर, प्रशांत वानखडे यांचे पथक केवल कॉलनीत पोहोचले. दरम्यान पोलिसांनी संजय दळवीची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत देशी कट्टा खोचलेला आढळून आला. पोलिसांनी संजय दळवीला अटक करून देशी कट्टा जप्त केला. त्याच्याविरुध्द ३, ७ आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे, संजय दळवी याने चार महिन्यांपूर्वी घरात फायरिंग केल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. वर्षभरापूर्वी संजय दळवीची पत्नी जळून मृत्यू पावली. तीच्या मृत्युला कारणीभुत असल्याचा आरोप संजयच्या आईवर लागला होता. तेव्हापासून संजयच्या मानसिकतेवर आघात झाला. तो घरातील भिंतीवर पत्नीचा फोटो लावून फोटोवर फायरिंग करीत असल्याचे काही नागरिकांना दिसले होते. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संजयच्या घराची पाहणी केली. तेव्हा भिंतीवर काही निशाण आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.