शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटनेतील मास्टरमार्इंड शोधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:40 IST

भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या घटनेचा मास्टरमार्इंड शोधून काढा.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडची मागणी : सीबीआयमार्फत चौकशी करा

आॅनलाईन लोकमतअमरावती : भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या घटनेचा मास्टरमार्इंड शोधून काढा. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रणजित तिडके यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव एकत्र आले होते, असे नमूद केले. यावेळी पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मात्र, विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी षड्यंत्र रचून १ जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या कार्यक्रमावर हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरी विचारसरणीवर असल्याचा प्रहार संभाजी ब्रिगेडने केला. या घटनेमागे जातीयवादी प्रवृत्ती असल्याचा आरोप करीत मास्टरमार्इंड शोधून काढा, अशी मागणी करण्यात आली. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कठोर कारवाई करताना त्यांच्या संघटनांची चौकशी करावी. आरोपींचा शोध घेऊन तपास सीबीआयकडे सोपवावा, असे निवेदनात म्हटले आहे. यात खरा आरोपी कोण? हे लवकर समाजापुढे आणावे. जणेकरून दोन समाजात निर्माण होणारी तेढ, गैरसमज व अफवा थांबतील, असे संभाजी ब्रिगेडचे रणजित तिडके, शुभम शेरकर, संजय ठाकरे, शरद काळे, लोकेश म्हाला, शुभम बाबुरकर, सुयोग वाघमारे, कैलास चव्हाण, पीयूष साळवे, आशिष देशमुख, अक्षय खडसे आदींनी निवेदनातून म्हटले आहे.परिवर्तनवादी विचारसरणीवर हल्लाभीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेला भ्याड हल्ला म्हणजे परिवर्तनवादी विचारसरणीवर हल्ला होय, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केला आहे. जातीयवादी प्रवृत्तीकडून बहुजन समाजात तेढ निर्माण करण्याचे हे कटकारस्थान आहे. या घटनेतील मास्टरमार्इंड शोधून आरोपींची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. परिवर्तनवादी लोकांना शांत डोक्याने आणि नियोजनपूर्वक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र असल्याचेही संभाजी ब्रिगेडने प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.