शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आर्थिक विकास महामंडळे आॅक्सिजनवर; बेरोजगारांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 11:02 IST

राज्यात ओबीसी, एससी व ईबीसी संवर्गातील बेराजगारांना कर्ज पुरवठा करणाऱ्या आर्थिक विकास महामंडळांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाने गत तीन वर्षांपासून अनुदान दिले नसल्याने ते आॅक्सिजनवर आहेत.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान नाही बेरोजगार कर्जापासून वंचित

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यात ओबीसी, एससी व ईबीसी संवर्गातील बेराजगारांना कर्ज पुरवठा करणाऱ्या आर्थिक विकास महामंडळांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाने गत तीन वर्षांपासून अनुदान दिले नसल्याने ते आॅक्सिजनवर आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रोजगाराची साधने उपलब्ध करताना वणवण भटकंती होत आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या नियंत्रणात अणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ, संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास आर्थिक विकास महामंडळ, अपंग आर्थिक विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ चालविले जातात. मात्र, ही महामंडळे यापूर्वी अपहार, भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. काही राजकारण्यांनी तर महामंडळांना ‘साधन’ बनवून आर्थिक लाभ कुटुंबीयांनाच मिळवून दिल्याचे सीआयडीने भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान स्पष्ट केले. कर्जपुरवठ्याची कोट्यवधींची थकीत रक्कम बुडीत निघाली. मात्र, आता राज्य आणि केंद्र सरकारनेही या महामंडळांना वित्तीय पुरवठा बंद केल्याने गत तीन वर्षांपासून कर्ज पुरवठा बंद आहे. अमरावती जिल्ह्यात महात्मा फुले १० कोटी, इतर मागास आर्थिक ३.४५, अण्णाभाऊ साठे तीन कोटी, संत रविदास आर्थिक विकास महामंडळाकडे १.६४ कोटी रूपये कर्ज वसुली थकीत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम होत आहे. राज्य शासनाने तरतुदीनुसार अनुदान दिले असून केंद्र सरकारच्या ‘एनएसएफडीसी’कडून अनुदान मिळालेले नाही.३८५ कोटींच्या अपहारामुळे महामंडळावर परिणामआ. रमेश कदम यांनी २०१२ ते २०१५ या कालावधीत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात ३८५ कोटींचा अपहार केल्याचे सीआयडीने चौकशीदरम्यान स्पष्ट केले. आ. कदम हे अपहारप्रकरणी कारागृहाची हवा खात असले तरी त्यांच्या या प्रवृत्तीमुळे एकूणच महामंडळाच्या कारभारावर विपरित परिणाम झाला आहे. कर्जपुरवठा, वसुली आणि अनुदान आदी विषय रेंगाळले आहेत.महामंडळाचे ५०० कोटींचे भाग भांडवल आहे पण, आतापर्यंत ६०० कोटी खर्च झालेत. मुख्यमंत्र्यांनी नव्याने निधी मंजूर केला आहे. सध्या ही फाईल विधी विभागाकडे आहे. केंद्र सरकारकडून एनएसएफडीसीचे अनुदान मिळाले नाही.- राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Governmentसरकार