शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:58 IST

पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली.

ठळक मुद्देनवा स्रोत शोधला । प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या जिल्हा परिषदेत पाणीटंचाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच प्रशासकीय यंत्रणेकडून गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पाण्याच्या स्रोत असलेल्या जागेचा शोध घेण्यात आला आणि मुख्यालय परिसरातच नव्याने बोअरवेल करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिनी मंत्रालयातील पाणीटंचाई दूर होणार आहे.सध्या दुष्काळ व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टंचाई असल्यामुळे जिल्हाभरातील ४३ गावांत ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर २४९ गावांत २७६ विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे आपली तहान भागवावी लागत आहे. अशातच पाणीटंचाईची झळ ही जिल्हा परिषदेत पोहोचली होती. परिणामी ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने नवीन बोअर केले. मात्र, या बोअरला पाण्याचा पुरेसा स्रोत न मिळाल्याने परिस्थिती कायम होती. काही दिवसांपासून झेडपी अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबत वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागल्याचे वास्तव आहे. पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कूलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे.झेडपीचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी पाण्याची समस्या होती. त्यावर पर्यायी व्यवस्था केली. मात्र, ती यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा नव्या पाणी स्रोताचा शोध घेऊन बोअर करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला.- नारायन सानप,डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन

टॅग्स :water shortageपाणीटंचाई