प्रशासनाचे पत्र : महापौरांच्या निर्णयानंतर महापालिकेची कार्यवाहीअमरावती : शहरात रस्ता दुभाजक आणि चौकांतील आयलन्डमध्ये भुयारी टेलिकॉम मस्ट टॉवर उभारणीचा करारनामा रद्द करण्यात आला आहे. महापौरांनी सभागृहात घेतलेल्या निर्णयानुसार प्रशासनाने सदर कार्यवाही केली आहे. त्यामुळे परवानगीनुसार उभारण्यात आलेल्या आठ टॉवरवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे.रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीने शहरात मोबाईल ४ जी सेवा पुरविण्यासाठी २५ जागांवर टॉवर उभारणीची परवनागी मागितली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठ जागांवर टॉवर उभारणीची परवानगी महापालिका प्रशासनाने अटी, शर्थीवर दिली होती. मात्र, रिलायन्स कंपनीने २४ सप्टेंबर २०१५ नंतर ४५ दिवसांत करारनामा के ला नाही. त्यामुळे ही बाब महापालिका अधिनियमान्वये नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवून सदर करारनामा रद्द करण्याचा निर्णय नोंव्हेबरच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मागणीनुसार महापौर चरणजितकौर नंदा यांनी घेतला. ही कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील सभागृहाने दिले होते. त्याअनुषंगाने प्रशासनाने रिलायन्स कंपनीला ४५ दिवसांच्या आत नोंदणी करारनामा केला नसल्याचे कारण पुढे टॉवर उभारणीचा करारनामा रद्द करण्याबाबतचे पत्राद्वारे कळविले आहे. तसेच एक वर्षांचे भाडे व सुरक्षा रक्कम महापालिकेने जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने टॉवर उभरणीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शहरवासीयांना तूर्तास ४ जी सेवेपासून वंचित रहावे लागण्याचे संकेत आहे.