लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : लॉकडाऊनच्या काळात रविवारी तालुक्यातील धामोडी येथे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पडले. मुलीच्या घरात झालेल्या या छोटेखानी समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले.तालुक्यातील धामोडी येथे रविवारी सकाळी १० वाजता अशोक गावंडे यांची मुलगी श्रद्धा हिचा विवाह अंजनगाव तालुक्यातील रत्नापूर येथील नरहरी सरोदे यांचा मुलगा श्रीकांत यांच्यासोबत पार पडला. विवाहप्रसंगी नवदाम्पत्यासह पाहुण्यांनीदेखील चेहऱ्याला मास्क बांधलेला होता. सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात गर्दी टाळण्याकरिता संचारबंदी व लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. याप्रतिसाद देत हा विवाह नवयुवकांसाठी आदर्श ठरला. या विवाहासाठी गावातील मोजक्या लोकांना आमंत्रित करण्यात आले. जेवणावळही उठविण्यात आली नाही. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर झालेला हा विवाह आदर्श ठरला.
अन् त्यांनी घरातच घेतले सात फेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST
तालुक्यातील धामोडी येथे रविवारी सकाळी १० वाजता अशोक गावंडे यांची मुलगी श्रद्धा हिचा विवाह अंजनगाव तालुक्यातील रत्नापूर येथील नरहरी सरोदे यांचा मुलगा श्रीकांत यांच्यासोबत पार पडला. विवाहप्रसंगी नवदाम्पत्यासह पाहुण्यांनीदेखील चेहऱ्याला मास्क बांधलेला होता. सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.
अन् त्यांनी घरातच घेतले सात फेरे
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन : अल्प खर्च, मोजके पाहुणे