लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निखिल पाटील या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी अखेर सिटी कोतवाली पोलिसांनी अनिल अग्रवाल (५०) यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. अनिल अग्रवाल हे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि एका सांध्य दैनिकाचे संपादक आहेत.पोलीस सूत्रांनुसार, निखिल पाटील (२८) हा मराठी पत्रकार भवनात व्यवस्थापन आणि देखभालीसाठी कार्यरत होता. तो पगारी कर्मचारी होता. अध्यक्षांच्या दालनात पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघड झाले. घडलेल्या प्रकाराने पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले. निखिलच्या अकल्पित जाण्याचा धक्का कुटुंबीयांसह अनेकांना बसला.गुरुवारी निखिलच्या आई अरुणा पाटील यांनी अनिल अग्रवाल हेच निखिलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. निखिलला वेतनापोटी दरमहा सहा हजार रुपये मिळायचे. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांपासून निखिलला वेतन देण्यात आले नव्हते. त्याला वेतनाची नितांत गरज होती. त्याने अनिल अग्रवाल यांच्याकडे वेतनाच्या रकमेची वारंवार मागणी केली; परंतु अग्रवाल यांनी वेतन देण्यास नकार दिला. निखिल मानसिक तणावात गेला आणि त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशा आशयाची फिर्याद निखिलच्या आईने पोलिसांना दिली. त्यानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.रवि राणा यांनी केली होती अटकेची मागणीबडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी निखिलच्या आईला भेटून घटनाक्रम जाणून घेतल्यावर अनिल अग्रवाल यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी गुरुवारी उचलून धरली.
अनिल अग्रवालविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST
गुरुवारी निखिलच्या आई अरुणा पाटील यांनी अनिल अग्रवाल हेच निखिलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. निखिलला वेतनापोटी दरमहा सहा हजार रुपये मिळायचे. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांपासून निखिलला वेतन देण्यात आले नव्हते. त्याला वेतनाची नितांत गरज होती. त्याने अनिल अग्रवाल यांच्याकडे वेतनाच्या रकमेची वारंवार मागणी केली; परंतु अग्रवाल यांनी वेतन देण्यास नकार दिला.
अनिल अग्रवालविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
ठळक मुद्देनिखिल पाटील प्रकरण : आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप