लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ४.३० वाजता पथ्रोट येथे घडली होती. दरम्यान १३ महिन्यांनी, ७ सप्टेबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.गजानन धमुर्जी कैकाडे (३५) व ज्योत्स्रा गजानन कैकाडे (३०, दोन्ही रा. पथ्रोट) अशी मृतांची नावे आहेत. मृत पतीपत्नीचे नातलग व साक्षीदारांचे बयाण, सोबतच अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावरून पथ्रोट पोलीस खून व आत्महत्या या निष्कर्षाप्रत पोहोचले. ज्योत्स्रा कैकाडे हिचा गळा आवळला गेल्याने त्यांचा श्वासोच्छवास थांबला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. आरोपी पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या निष्कर्षावरून ठाणेदार मनोज चौधरी यांनी सरकारीपक्षातर्फे तक्रार नोंदवून मृत पती गजानन कैकाडे याचेविरूद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलीस सुत्रानुसार, घरगुती वादातून कैकाडे दाम्पत्यात कडाक्याची भांडणे होत होती. दरम्यान, १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ते दाम्पत्य मृतावस्थेत शेजाºयांना दिसले होते. त्यावेळी पथ्रोट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. चौकशीदरम्यान मृत दाम्पत्याच्या नातेवाईक व शेजाºयांचे बयाण नोंदविण्यात आले होते.
वर्षभरानंतर मृत पतीविरोधात गुन्हा दाखल; पत्नीचा गळा आवळून केला होता खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:50 IST
पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ महिन्यांनी, ७ सप्टेबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्षभरानंतर मृत पतीविरोधात गुन्हा दाखल; पत्नीचा गळा आवळून केला होता खून
ठळक मुद्देपथ्रोट येथील घटना