वरूड : तालुक्यातील ढगा येथील एका २८ वर्षीय महिलेने तिच्या सहा महिन्याच्या मुलीसह इस्माईलपूर शिवारातील एका शेतात विहिरीमध्ये बालिकेसह उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेविरुद्ध बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशीअंती बरेच उघड होण्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे.
मृत महिलेचे नाव प्रियंका मनोहर धोटे (२८) व मुलीचे नाव स्वरा आहे. मृत महिला ही गुरुवारी दुपारी ४ वाजता मुलीसह घरून निघून गेली होती. ती परत आली नाही म्हणून नातेवाइकांनी शोध घेतला, मात्र आढळून आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी इस्माईलपूर शेतशिवारात जनार्दन घोरमाडे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळले. पोलिसांनी मृत प्रियंकाविरुद्ध भादंविचे ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. आत्महत्या करण्याचे कारण काय, याबाबत बरेच धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे.