शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:27 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका शासनामार्फत दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी विविध दलित संघटनांतर्फे सोमवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : दलित संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका शासनामार्फत दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी विविध दलित संघटनांतर्फे सोमवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.अ‍ॅट्रासिटी कायद्यात प्रस्तावित बदलांमुळे एससी, एसटी, प्रवर्गावर अन्याय होईल, असे निवेदनात म्हटले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करावी, याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तज्ज्ञ विधिज्ञाची नियुक्ती करावी, अशी मागणी भीम आर्मीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात केली. रिपाइं, बसपा, भारिप-बमसं यासह दलित संघटनांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले.भारत बंदचे जिल्ह्यात पडसादआंदोलनात भीम आर्मीचे प्रदेश सचिव मनिष साठे, विदर्भ प्रमुख सचिन पट्टेबहादूर, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, अमोल इंगळे,मनोज वानखडे, अनंत इंगळे, बंटी रामटेके, प्रवीण बनसोड, शरद वाकोडे, प्रवीण गजभिये, राहूल भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.चर्मकार महासंघाचीही मागणीराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश जामठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारा केली आहे. यावेळी महासंघाचे विदर्भ सचिव राजेंद्र तांबेकर, श्यामकुमार आकोडे, जगदेव रेवसकर, विजय शेकोकार, युवा जिल्हाध्यक्ष मोहन पटके, रमेश सरोदे व पदाधिकारी उपस्थित होते.तिवस्यात तहसीलदारांना निवेदनतिवसा : शहरातील आंबेडकरवादी संघटना, दलित एकता मंच, भारिपच्यावतीने बंद पुकारण्यात आला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेकडो आंदोलकांनी पेट्रोल पंप चौकात जमून शासनविरोधात घोषणा दिल्या. बाइक रॅली काढून तिवसा तहसील कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी नायब तहसीलदार डी.टी. पंधरे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डी.एच. मेश्राम, दिलीप शापामोहन, सतीश यावले, सागर भवते, विनायक भरडे, राजकुमार विघ्ने, ओमप्रकाश वाघमारे, भारत दाहाट, धर्मपाल सोनटक्के, सुरेश मोरघडे, सुरेश मकेश्वर, अरविंद बनसोड, राहुल मनोहर, साहेबराव यावले, दौलतराव सोनटक्केसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसा पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी शहरात दंगा नियंत्रण पथकासह तिवसा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केलां होतानांदगावात कडकडीत बंदनांदगाव खंडेश्वर : युवा भीम गर्जना संघटनेच्यावतीने नांदगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व बाजारपेठ बंद होती. संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष कुंदन मेश्राम, ऋषी गाडगे, सिद्धार्थ मेश्राम, विकी भगत, सागर सोनोने, धम्मपाल गाडगे, प्रज्वल लोहकरे, निकेश घोडेस्वार, सौरभ चौधरी, विकी कावळे, रत्नदीप वरघट, मंगेश सवाई, शेखर तिडके, आकाश हुमने, पप्पू घोडेस्वार, बंटी खडसे, रवि सोनोने, सूरज सोनोने, राजकुमार डोंगरे, आकाश लोहकरे, सूरज अंभोरे, अभिजित वानखडे व युवा भीम गर्जना संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.बडनेरात ठाणेदारांना निवेदनबडनेरा : अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सोमवार, २ एप्रिल रोजी ठाणेदार गोपाल भारती यांना निवेदन देऊन बडनेरावासीयांनी सहभाग नोंदवला.शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन नव्यावस्तीतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत शांततेत मार्च काढून ठाणेदार भारती यांना निवेदन दिले.'भारत बंद'च्या इशाऱ्याने शहरात तगडा बंदोबस्त'भारत बंद'च्या इशाऱ्यामुळे सोमवारी शहरात आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता. विशेषत: व्यापारी प्रतिष्ठानावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. चौकाचौकांत पोलीस यंत्रणा सज्ज होती. भारत बंदला अमरावतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.