शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसानंतर संपला जीवनाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:33 IST

वाचन करताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून सर्व्हिस लाइनमध्ये कोसळलेल्या १५ वर्षीय मुलीचा जगण्यासाठी संघर्ष तिसऱ्या दिवशी संपला. गुरुवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्देइंद्रायणीचा मृत्यू : तिसऱ्या मजल्यावरून पडली जमिनीवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाचन करताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून सर्व्हिस लाइनमध्ये कोसळलेल्या १५ वर्षीय मुलीचा जगण्यासाठी संघर्ष तिसऱ्या दिवशी संपला. गुरुवारी दुपारी ३ वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.इंद्रायणी विनोद खोकले (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. ती श्री गणेशदास राठी विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होती. कठोरा परिसरातील रंगोली लॉननजीक गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये ती कुटुंबासह तिसºया माळ्यावर राहत होती. ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता इंद्रायणी ही तिच्या फ्लॅटमध्ये शेवटच्या टोकावर ग्रिलच्या बाजूने वाचनाकरिता बसली होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती तिसऱ्या मजल्यावरून थेट सर्व्हिस लाइनमध्ये काँक्रीट बांधकामावर कोसळली. यावेळी तिचे वडील लग्न सोहळ्याला गेले होते, तर आई शुभांगी घरकामात व्यस्त होती. अभियांत्रिकीला असलेली बहीण पयोष्णी कामानिमित्त बाहेर होती. तळमजल्यावरील कुटुंबांनी तिची किंकाळी ऐकली आणि सर्व्हिस लाइन गाठली. यानंतर तिला तातडीने रेडिएंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृत्यूशी तिची झुंज गुरुवारी दुपारी ३ वाजता संपुष्टात आली. गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गुरुवारी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.हाडांचा चुराडातिसऱ्या मजल्यावरून अनवधानाने कोसळल्याने इंद्रायणीच्या छातीच्या बरगड्या, हातपायाची हाडे व मणक्याचीही हाडे तुटली होती.सर्वत्र हळहळइंद्रायणीचे वडील विनोद खोकले हे शेतकरी आहेत. दोन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी दोन्ही मुलींना त्यांनी अमरावतीला आणले. इंद्रायणी ही अभ्यासात हुशार होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात