पाचशे, हजाराच्या नकली नोटा चलनात : ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची गरजलोकमत विशेषमोहन राऊत अमरावतीदसरा व दिवाळीच्या पर्वावर होणारी कोट्यवधींची खरेदी व गजबजलेला बाजार याचा फायदा घेत लाखो रूपयांच्या नकली नोटा चलनात येण्याची शक्यता वाढली आहे़आगामी काळात नवरात्र, दसरा, दिवाळी असे मोठे सण आहेत़ या काळात जिल्ह्यात कोट्यवधींची कपडे, घरातील वस्तू, दागिने, विविध खरेदी केली जाते़ दरवर्षी गजबजलेल्या ठिकाणाचा फायदा घेऊन बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार युध्दस्तरावर राबविले जाते़ मागील दोन वर्षांपूर्वी धामणगाव शहरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष वसंत बिरे यांनी एका बँकेतून जमा ठेव असलेले दीड लाख रूपये काढले. बँकेच्या रोखपालाने एक हजारांच्या शंभर व पाचशेच्या शंभर अशा नोटा दिल्या होत्या. त्यावेळी बिरे यांनी सदर बँकेतून रक्कम काढून दुसऱ्या बँकेत भरण्यासाठी गेले असता एक हजार ची एक व पाचशेची एक अशी नकली नोट दुसऱ्या बँकेतील रोखपालाच्या लक्षात आली होती़ विशेष म्हणजे ज्या बँकेतून बिरे यांनी यापूर्वी रक्कम काढली होती़ त्या बँकेने या नकली नोटा परत घेऊन दुसऱ्या नोटा दिल्या़ तसेच येथील स्टेट बँकेतून बनावट नोटा मिळाल्या होत्या. त्यानंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला असला तरी अनेक दिवस विदर्भात बनावट नोटांचा प्रकार वाढत गेला़ दसरा व दिवाळी या सणादरम्यान बनावट नोटा बाजारात आल्या होत्या. बँकेत हजारांच्या नोटा भरताना नोटावरील नंबर चलनात लिहून द्यावे लागतात. ज्यावेळी आपण बँकेतून रक्कम काढतेवेळी बँक ग्राहकाला नोटा देताना त्यांच्याकडील नोटांचे विवरण देत नाही़ नोटा खऱ्या आहेत की खोट्या, याचे यंत्रही ग्राहकाकडे नसते. शिवाय बँकेतून काढलेली रक्कम तपासून पाहत असताना चोरट्याकडून धोका होण्याची शक्यता असते़ अशावेळी ग्राहक मिळालेली रक्कम बॅगेत किंवा खिशात ठेवून घरी नेतो़ विशेषत: सर्वच ग्राहकांना बनावट नोटा ओळखण्याचे तंत्र अवगत नसते़ त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला बसतो़ अशीच फसवणूक देशी दारू विक्रेता यांची मागील वर्षी दसरा सणाच्यादरम्यान झाली होती़ दिवाळीचा मोठा सण असल्यामुळे सर्वसामान्य माणूस वर्षातून एकदा खरेदीसाठी बाहेर पडतो. सोयाबीनचे पीक निघाल्यानंतर दलाल किंवा सावकाराकडून ही रक्कम घेऊन शेतकरी बाजारात येतो़ नकली नोट अशा भोळ्याभाबड्या माणसाच्या हाती पडते. बँकेतून पैसे काढल्यास बँक जबाबदारी स्वीकारते. परंतु एखाद्या व्यक्तीकडून ही नकली नोट स्वीकारल्यास साफ नकार मिळतो. आहे़ पाचशे व हजारांच्या बनावट नोटा ओळखायच्या कशा, याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे़
सणासुदीच्या पर्वावर बनावटी नोटा
By admin | Updated: September 30, 2015 00:35 IST