शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये घुसला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 03:13 IST

स्थानिक बस स्टँडवर भरधाव ट्रेलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरल्याने...

हॉटेलचा चुराडा : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील घटना, एक गंभीर तळेगाव दशासर : स्थानिक बस स्टँडवर भरधाव ट्रेलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरल्याने झालेल्या भयंकर अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात हॉटेलसह शेजारच्या जि.प. हायस्कूलची संरक्षण भिंत देखील उद्धवस्त झाली. ही घटना २८ आॅक्टोबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान घडली. प्रेमसिंग शिवलाल चंदनखेडे (४०,रा.वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मृताचे तर प्रकाश मर्मट असे गंभीर जखमीचे नाव आहे. या अपघातात प्रकाशने दोन्ही पाय गमावले असून त्याला उपचारार्थ यवतमाळ येथील रूग्णालयात दाखल केले आहे. विस्तृत माहितीनुसार, नागपूरकडून औरंगाबादकडे लोखंड घेऊन जाणारे ट्रेलर तळेगाव बसस्थानकावरील गतिरोधकावरून उसळून महालक्ष्मी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या नव्या कोऱ्या वाहनावर धडकले आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये शिरले. या अपघातात जि.प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची ५० फुट लांबीची भिंत देखील कोसळली व हॉटेलचा चुराडा झाला. बाजूलाच असलेल्या सुलोचना तुळसकर व सतीश बुल्ले यांच्या गॅरेजचेसुद्धा लाखो रूपयांचे नुकसान झाले. घटनेच्यावेळी बसस्थानकावरील अपघातग्रस्त हॉटेलमध्ये लातूर येथून कांदा भरून निघालेला ट्रक क्र. एम.एच.२०-डी.ई.८०६२ चा चालक प्रेमसिंग चंदनखेडे हा चहा पिण्यास थांबला होता. या अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हॉटेल कामगार विशाल मनोहरे हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर ट्रेलर चालकाने पळ काढला. घटनास्थळी ठाणेदार सुरडकर व सहकारी आणि महामार्ग पीएसआय ठाकूर यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रेलर चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार शिवाजी राठोड करीत आहेत. (वार्ताहर)