शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

पोहरा-चिरोडी जंगलात पेटू लागले वणवे

By admin | Updated: April 18, 2016 23:55 IST

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बिटमध्ये सोमवारी वणवा भडकला.

वनविभाग सज्ज : दोन रेंजमध्ये आतापर्यंत दोनदा लागल्या किरकोळ आगीअमोल कोहळे पोहरा बंदीवडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बिटमध्ये सोमवारी वणवा भडकला. यामुळे वनकर्मचारी खडबडून जागे झालेत. आतापर्यंत या दोन्ही वन वर्तुळात दोन वेळा किरकोळ आगी लागल्यात. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वणव्याचा सामना करण्यास वनविभाग सज्ज झाला आहे. आगी लावणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने संबंधित वनकर्मचाऱ्यांना दिले आहेत. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ती भडकण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यासाठी दोन्ही रेंजचे वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचतात. पोहरा वर्तुळातील इंदला बिटमधील ७० कंपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी आग लागताच वडाळीचे प्रभारी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, सहायक वनसंरक्षक एस.डी.सोनोने, वनपरीक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, पोहरा वर्तुळाचे वनपाल विनोद कोहळे, इंदला बिटचे वनरक्षक शेंडे, वनरक्षक मनोज ठाकूर, खडसे, देशमुख, नैतनवार, वनमजूर बाबाराव पळसकर, दीपक नेवारे, किशोर धोटे, चव्हाण घटनास्थळी पोहोचले. आगीमुळे वन्यप्राण्यांना धोका पोहोचला नाही. मात्र, ही आग गुराखी अथवा शिकाऱ्यांनी लावली असावी, असा कयास वनविभागाने लावला आहे. याप्रकरणी वनविभागाने अज्ञात आरोपीविरूध्द १०३/२४ व २६ भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २४ (१) (ब) तसेच कलम २६ (१) (ब) अन्वये गुन्हा नोंदविला. वडाळी, बडनेरा व पोेहरा वनवर्तुळातील वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. अग्निशमन दलाची चमूदेखील घटनास्थळी पोहोचली होती. यापूर्वी चिरोेडी वनपरिक्षेत्रात साधारणत: आठवड्यापूर्वी आग लागली होती.