शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘अम्ब्लोपिया’मुळे मुलांची दृष्टी जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:20 IST

तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देसावधान! : राज्यात ९१ हजार मुलांमध्ये दृष्टीदोष, वेळीच काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिरळेपणा, जाड भिंगाचा चष्मा वापरणाऱ्या मुलांच्या डोळ्याची तपासणी ४ ते ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. अन्यथा अम्ब्लोपिया आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात ९१ हजार मुलांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास अशा मुलांची दृष्टी कायमची जाण्याची भीती वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली आहे.अम्ब्लोपिया (लेझी आय) हा एक प्रादुर्भावामुळे आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामुळे जवळपास ५ ते १० टक्के लहान मुले ग्रस्त आहेत. आपल्या डोळ्यावर पडणारा प्रकाश डोळ्यातील दृष्टीपटलातून डोळ्यात शिरतो. त्याचे रुपांतर मज्जातंतू संदेशामध्ये होऊन तो डोळ्याच्या नसातून मेंदूपर्यंत जातो. मेंदू व डोळ्याच्या साह्याने आपणास दृष्टी येते. लेझी आय म्हणजे आपला एक किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी काही कारणास्तव कमी होते व डोळा आळशी होतो. तपासणी केल्यावर जरी डोळा बाहेरून सामान्य वाटत असला तरी त्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुसºया डोळ्यावर ताण येतो. लहान मुले बरेचदा सांगण्यास असमर्थ असल्याने जोपर्यंत तिरळेपणा वा मोतीबिंदू स्पष्ट दिसणार नाही तोपर्यंत त्याचे निदान होेणार नाही.अम्ब्लोपिया आजारात डोळा बाहेरून सामान्य वाटत असेल तर पालकांनाही ते ओळखणे शक्य होणार नाही. ज्या कुटुंबात डोळा तिरळेपणा, चष्म्याचे नंबर, मोतीबिंदू वा इतर आजार असेल त्यांनी आपल्या १ ते ४ वर्षांपर्यंच्या मुला-मुलींच्या डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. नेत्रतज्ज्ञ विविध प्रकारच्या चिकित्सा करून लेझी आय निदान करण्यास समर्थ असतात. या आजाराचे शक्य तेवढे लवकर निदान व उपचार केल्यास दृष्टी टिकवून ठेवणे सोयीचे होईल. वेळीच उपचार न केल्यास कायमस्वरुपी दृष्टी निकामी होऊ शकते व नंतर सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे अ‍ॅम्ब्लॉपिया आजारावर उपचार करण्याची योग्य वेळ म्हणजेच जन्मापासून ४ वर्षांपर्यंत करावे. तसे १० वर्षांपर्यंत होऊ शकेल आहे. पण त्याचा किती लाभ होऊ शकेल, हे सांगणे कठीण असल्याची इर्विन रुग्णालयाच्या बाल नेत्रतज्ज्ञ प्रीती तायडे म्हणाल्या.अम्ब्लोपिया आजाराची ओळख उशिरा होते. परंतु उपचार किमान ८ वर्षांपर्यंत करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला आयुष्यभरासाठी दृष्टी गमावण्याची वेळ येते.- नम्रता सोनोने,जिल्हा नेत्र सर्जन,इर्विन रुग्णालय, अमरावतीउपाययोजनालेझी आयचे निदान उशिरा कळते. त्यावर उपचार दुष्कर होण्याची वाट न पाहता नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून योग्य उपचाराद्वारे पाल्याला दृष्टीदोषापासून वाचवावे. मोबाईल, टी.व्ही.व्हिडीओ गेम खेळण्याची मुलांमधील क्रेज वाढत असून हे अम्ब्लोपिया आजारास कारणीभूत ठरू शकते.लक्षणे१ ते ४ वर्षांपर्यंत डोळ्यात तिरळेपणा, चष्म्याचा नंबर, एका डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्याची वृद्धी थांबणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.

टॅग्स :Healthआरोग्य